हत्तीने घातला लाडक्या गणरायाला हार; व्हिडिओ पाहून म्हणाल, क्या बात है!!

0
1
elephant wore a necklace for Bappa
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज गणेश चतुर्थी असून सर्वत्र बाप्पाचे आगमन धुमधडाक्यात सुरु आहे. देशात अत्यंत उत्साहाचे वातावरण असून ढोल- ताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत केलं जात आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोशल मीडियावर सुद्धा बापाच्या आगमनाचे विविध पोस्ट, व्हिडीओ अपलोड होताना दिसून येत आहेत. ह्यातच आता एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हत्ती बाप्पाला हार घालताना दिसून येत आहे.

काय आहे व्हायरल विडिओ मध्ये?

व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता कि, बाप्पाच्या आगमनासाठी शोभा वाढावी ह्यासाठी हत्ती मिरवणुकीत आणला गेला. आणि चक्क हत्तीने सर्वाना चकित करत बाप्पाच्या गळ्यात आपल्या सोंडीने हार घातला. हत्ती आणि बाप्पाचे नाते काय आहे, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे हत्तीने बाप्पाला घातलेला हार पाहून सर्व नागरिक बाप्पाच्या गजरात हा क्षण साजरा करताना व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

https://x.com/VertigoWarrior/status/1703790291575034341?s=20

व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

एका ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘Bappa is here’ असे कॅप्शन देत व्हिडिओला पोस्ट करण्यात आले आहे. व्हिडीओला आतापरेंत 396k व्हीव्हज आल्या असून 2199 वेळेस लोकांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे अद्याप कळू शकले नाही. परंतु लोक ह्या व्हिडीओला तुफान व्हायरल करताना दिसून येत आहे.

दरम्यान राजकीय नेते तसेच मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या घरीही आज वाजत गाजत बाप्पाचे आगमन झाले आहे. मुंबईतील नवसाच्या पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांची रंग लागली आहे. एकूणच काय तर गणेशोत्सवानिमित्त अत्यंत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.