आदिवासी हक्क कार्यकर्ते स्टेन स्वामी यांचे निधन !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आदिवासी हक्क कार्यकर्ते स्टेन स्वामी यांचे आज वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आले होते. फादर स्टॅन स्वामी ज्या रुग्णालयात उपचार घेत होते त्या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांंनी उच्च न्यायालयाला याची माहिती दिली आहे. 28 मे रोजी कोर्टाच्या आदेशानंतर स्वामींवर होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. खासगी रुग्णालयातील त्यांच्या उपचाराचा खर्च त्याचे सहकारी व मित्र घेत होते.

मे महिन्यात स्वामींनी हायकोर्टाच्या सुट्टीतील खंडपीठाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगितले की, तळोजा जेलमध्ये त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांना उपचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करावा अशी विनंती त्यांनी हायकोर्टाकडे केली होती. तसेच स्वामी असेदेखील म्हणाले की जर तेथे असेच कार्य चालू राहिले तर ते लवकरच मरणार आहे. अखेर आज त्यांचे निधन झाले.

स्टेन स्वामी यांनी 31 डिंंसेबर, 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदे मध्ये प्रक्षोभक भाषण केले होते असा दावा पोलिसांनी केला आहे. या भाषणामुळे दुसऱ्या दिवशी भीमा – कोरेगाव शोर्य स्मारकाजवळ हिंसाचार झाला असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. परंतु तीन वर्ष होऊनही या घटनेतील आरोपी असलेले विचारवंत, लेखक, मानव अधिकार कार्यकर्ते अजून अटकेमध्येच आहेत.

Leave a Comment