तुरटीच्या वापराने अशा प्रकारे केसांच्या समस्या करा दूर

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक महिलांना आणि पुरुषांना पांढऱ्या केसांच्या समस्येला सामोरे जावे लागते. या धावपळीच्या युगात आपल्या शरीराकडे आपण लक्ष देत नाही लेट नाईट पर्यंत मोबाईल युज करणे. सकाळी उशिरा उठणे वेळेवर जेवण न करणे यामुळे आपल्या शरीराला संबंधित अनेक समस्या उद्भवत असतात. तसेच आपल्या आहारात आणि आपल्या राहणीमानात झालेल्या बदलामुळे अनेक वेळा बऱ्याच समस्येला सामोरे जावे लागते.

अनेकजण केस पांढरे होण्याच्या समस्येनं ग्रस्त असतात. परंतु तुरटीचा वापर करून तुम्ही तुमचे पांढरे केस काळे करू शकता. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं तुरटीचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेऊयात. महिला आणि पुरुष साऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे.

पहिली पद्धत

– तुरटीचा एक लहानसा तुकडा फोडून बारीक करून घ्या. तो पाण्यात टाकून ठेवा.

– यात एक चमचा गुलाबपाणी घाला.
– या मिश्रणानं 5 मिनिटे केसांवर मसाज करा.
– 1 तासानं शॅम्पू करत केस धुवून टाका.
– आठवड्यातून 2 ते 3 दिवस हा प्रयोग करा. यानं पांढरे केस होण्यायी समस्या दूर होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’