हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यांनंतर ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. ट्विटरचे मालक होताच मास्क यांनी भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल आणि इतर दोन उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.
अॅलन मास्क यांनी पराग अग्रवाल, विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेहगलआणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पराग अग्रवाल यांच्यासह ट्विटरचे हे अधिकारी दीर्घकाळ इलॉन मस्क यांच्या निशान्यावरच होते. मस्कने त्यांच्यावर आणि ट्विटरवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खात्यांच्या संख्येबद्दल गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता.
Twitter CEO Parag Agrawal and chief financial officer Ned Segal ‘have left the company’s San Francisco headquarters and will not be returning’, reports US media
— ANI (@ANI) October 28, 2022
एप्रिलमध्ये अधिग्रहणाची घोषणा करण्यात आली होती
मस्कने या वर्षी 13 एप्रिल रोजी ट्विटरच्या अधिग्रहणाची घोषणा केली. त्यांनी हा करार $44 अब्ज $54.2 प्रति शेअर दराने ऑफर केला. परंतु, ट्विटरच्या बनावट खात्यांमुळे, ट्विटर आणि त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी 9 जुलै रोजी करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर ट्विटरने मस्कविरोधात अमेरिकन कोर्टात केस दाखल केली. यावर डेलावेअरच्या न्यायालयाने 28 ऑक्टोबरपर्यंत ट्विटरची डील पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.