Elon Musk च्या SpaceX ने भारतात स्थापन केली उपकंपनी, हाय-स्पीड इंटरनेट सर्व्हिस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती Elon Musk ची कंपनी SpaceX शी संलग्न असलेल्या Starlink ने भारतात रजिस्ट्रेशन केले आहे. ही कंपनी सॅटेलाइटद्वारे इंटरनेट सुविधा पुरवते. SpaceX च्या उपग्रह ब्रॉडबँड आर्म स्टारलिंकने डिसेंबर 2022 पर्यंत भारतात 2 लाख ऍक्टिव्ह टर्मिनल्ससह ब्रॉडबँड सर्व्हिस सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. कंपनीला आता फक्त सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.

या क्षेत्रात, ते Amazon Inc व्यतिरिक्त भारती Airtel आणि OneWeb, UK सरकारची जॉईंट व्हेंचर कंपनी यांच्याशी थेट स्पर्धा करेल. सरकारकडे दाखल केलेल्या डॉक्युमेंट्सनुसार, स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची ही कंपनी भारतात ब्रॉडबँड आणि इतर सॅटेलाईट आधारित सर्व्हिस देण्यासाठी लायसन्ससाठी अर्ज करेल.

कंपनीने म्हटले आहे की, SpaceX आता भारतातील 100 टक्के मालकीची कंपनी आहे. त्याचे नाव SSCPL – Starlink सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड आहे. स्टारलिंकचा दावा आहे की, तिला भारतातून 5,000 पेक्षा जास्त प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत.

हाय स्पीड इंटरनेट मिळेल
Starlink इंटरनेटच्या प्री-बुकिंगसाठी, $ 99 म्हणजेच सुमारे 7,300 रुपये सुरक्षा म्हणून भरावे लागतील, जे राउटर इत्यादीसाठी असतील. पेमेंट पूर्ण झाल्यावर, बुकिंग तुमच्या स्थानावर निश्चित होईल. सुरुवातीला, बीटा टेस्टिंग दरम्यान ग्राहकांना 50-150Mbps स्पीड मिळेल, जरी Elon Musk ने म्हटले आहे की, टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर, 300Mbps पर्यंतचा वेग दिला जाईल.

ही सिक्योरिटी 100% परत करण्यायोग्य आहे म्हणजेच बुकिंग केल्यानंतर तुमचा विचार बदलल्यास तुम्ही ते रद्द करू शकता आणि पैसे परत मिळवू शकता.