हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजून 15 दिवस लॉक डाऊन कायम राहील असेही जाहीर केले. परंतु असे असले तरी रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथील करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे कमी रुग्णसंख्या असलेल्या शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली राहू शकतील.
ज्या शहरे आणि जिल्ह्यांतील कोरोना पॉझिटिव्ह रेट १० टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि ऑक्सिजनयुक्त बेड्स ४० टकक्यांपेक्षा कमी भरलेले असतील अशा शहारांमध्ये दुकाने सकाळी ७ ते २ पर्यंत खुली ठेवण्याची मुभा असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, ज्या जिल्ह्यामध्ये स्थिती चिंताजनक असेल तिथे आणखी कडक निर्बंध लावले जातील, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर, ज्या जिल्ह्यांमध्ये स्थिती आटोक्यात आली असेल तिथे टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जाईल असं ते म्हणाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.