मुंबई प्रतिनिधी । राज्यात नवीन सत्ता समीकरणे निश्चित झाल्यामुळे आता भाजप आणि शिवसेना यांच्यातील नाते संबंध हे आता राज्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात असतील. अनेक वर्षे सोबत एकत्र काम केल्यानंतर शिवसेना व भाजप आता अधिकृतपणे वेगळे होणार आहेत. यामुळे साहजिक दोन्ही पक्षातील मैत्रीचं नातं आता हे पूर्वी प्रमाणे नसेल. ज्यां पक्षांशी तीस वर्षे एकत्र संघर्ष केला, आता सत्तेसाठी त्यांच्या सोबत शिवसेना भाजप विरोधात जात आहे.
ह्या सर्व घडामोडी व नवीन समीकरणे बघता इतक्या वर्षांच्या मैत्रीची आठवण शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज ट्विटवरून व्यक्त केली आहे. राऊत म्हणतात , ”कभी कभी कुछ रिश्तों से बाहर आना ही अच्छा होता है, अहंकार के लिए नही…स्वाभिमान के लिए !” असं भावनिक ट्विट केलं आहे. कधी कधी काही नात्यांमधून बाहेर येणे हे चांगले असते, अहंकारासाठी नाही तर स्वाभामनासाठी.
मुख्यमंत्री पदावर ठाम असलेल्या शिवसेनाला भाजपने मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिल्याने शिवसेना आणि भाजप यांच्यात वितुष्ट निर्माण होऊन आता सत्ता समीकरणे हे शिवसेना- राष्ट्रवादी-काँग्रेस असे सरकार स्थापन होण्याचा मार्ग निश्चित झाला असून आता फक्त औपचारिकता बाकी आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 22, 2019