समुद्राच्या लाटांपासून निर्माण होतेय ऊर्जा!! काय आहे हे तंत्रज्ञान?

Energy is generated from ocean waves
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण जग सध्या नवीकरणीय ऊर्जा स्रोताकडे आपले पावले टाकताना दिसत आहे. नवीकरणीय ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून मिळवलेली ऊर्जा अधिक शुद्ध स्वरूपात प्राप्त होते. त्यामुळे पर्यावरणावर होणारे घातक परिणाम खूपच कमी होतात. पृथ्वीचे वाढते तापमान लक्षात घेत  जगातील प्रत्येक नवनवीन ऊर्जा स्रोत शोधत आहेत. शास्त्रज्ञानी संशोधनातून समुद्राच्या लाटेपासून ऊर्जा प्राप्त करण्याचे तंत्रज्ञान शोधले आहे. युरोप मधील  Corpower Ocean ही कंपनीने हे अनोखे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

Corpower Ocean कंपनीने विकसित केलेले आहे काय तंत्रज्ञान :

हे संपूर्ण तंत्रज्ञान हे मानवी हृदयाच्या कामकरण्याच्या पद्धतीवरआधारित आहे. मानवी हृदय ज्याप्रमाणे रक्तावर दाब निर्माण करून रक्ताला गती देते त्याचप्रमाणे Corpower Ocean ने विकसित केलेले तंत्रज्ञान काम करते . समृद्रातील पाण्याच्या पृष्ठ भागावर होणाऱ्या हालचालीचा म्हणजेच waves चा वापर  piston च्या हालचालीसाठी केला जातो. Piston च्या हालचालीचा वापर गतिमध्ये (rotational motion) मध्ये करून Rotational Motion चे रूपांतर इलेक्ट्रिक ऊर्जेत केले जाते. सर्व प्रक्रियेत Tensioned Mooring सिस्टिमचा वापर केला जातो.

प्रत्येक युनिट 10 ते 20 मेगावॉट विदयुत ऊर्जा तयार करण्यात आहे सक्षम-

नवीन विकसित केलेले तंत्रज्ञान हवेच्या वापर करून विदयुत ऊर्जा तयार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा फारच कमी आहे. Corpower Ocean ने तयार  केलेले प्रत्येक युनिट 10 ते 20 मेगावाट विदयुत ऊर्जा तयार करण्यात सक्षम आहे. एकापेक्षा अधिक युनिटचा वापर करून Wavepark ची निर्मिती करून शेकडो मेगावॅट विदयुत ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते . कंपनीच्या माध्यमातून पोर्तुगाल मध्ये अश्या पद्धतीचे पार्कचे काम पुर्ण करण्यात आलेले आहे.