हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडने (ENG vs NED) सर्वात जास्त रन करून वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. नेदरलँडविरुद्धच्या (ENG vs NED) पहिल्या सामन्यात इंग्लंडने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 498 रन केले आहेत. वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंतचा हा सर्वाधिक स्कोर आहे. पहिले बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडने (ENG vs NED) इनिंगमध्ये तब्बल 26 सिक्स आणि 36 फोर लगावले आहेत. या खेळीमध्ये इंग्लंडकडून (ENG vs NED) तिघांनी शतकं तर एकाने अर्धशतक झळकावले आहे.
आयपीएल 2022 मध्ये धमाका करणाऱ्या जॉस बटलरने 70 बॉलमध्ये नाबाद 162 रनची खेळी केली, यामध्ये 7 फोर आणि 14 सिक्सचा समावेश होता. याशिवाय फिलिप सॉल्टने 93 बॉलमध्ये 122 आणि डेव्हिड मलानने 109 बॉलमध्ये 125 रनची खेळी केली. सॉल्टने 14 फोर आणि 3 सिक्स तर मलानने 9 फोर आणि 3 सिक्स मारल्या. याशिवाय लियाम लिव्हिंगस्टोनने 300 च्या स्ट्राईक रेटने 22 बॉलमध्ये नाबाद 66 रन केले, यात त्याने 6 फोर आणि 6 सिक्स लगावले आहेत.
वनडे क्रिकेटमधल्या सर्वाधिक स्कोअरपैकी पहिले तिन्ही स्कोअर इंग्लंडच्या (ENG vs NED) नावावर आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे हे तिन्ही स्कोअर इंग्लंडने मागच्या 6 वर्षांमध्ये केले आहेत. नेदरलँडविरुद्धच्या (ENG vs NED) या स्कोअरआधी इंग्लंडने 2018 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 481/6 तर 2016 साली पाकिस्तानविरुद्ध 444/3 एवढा स्कोअर केला होता.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.espncricinfo.com/series/england-in-netherlands-2022-1281442/netherlands-vs-england-1st-odi-1281444/match-report
हे पण वाचा :
Interest Rates : ‘या’ 5 खाजगी बँकाकडून बचत खात्यावर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!
‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
Post Office मध्ये खातेदारांसाठी ‘हा’ नंबर आहे खूप महत्वाचा !!!
EPFO मध्ये नॉमिनेशन करणे बंधनकारक, त्यासाठीचे संपूर्ण तपशील जाणून घ्या