उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पाणीपुरवठा विभागातील एका कनिष्ठ अभियंत्याने काही दिवसांपूर्वी आपली पत्नी आणि मुलीसोबत आत्महत्या (Suicide) केली होती. शैलेंद्र कुमार असे या अभियंत्याचे नाव आहे. शैलेंद्र कुमार हे आपल्या कुटुंबासोबत जानकीपुरम परिसरात रहात होते, त्यांनी काही दिवसांपूर्वीच विषप्राशान करून आपल्या कुटुंबासोबत आत्महत्या (Suicide) केली होती. शैलेंद्र कुमार हे पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत होते. शैलेंद्र कुमार यांनी आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी आपल्या घरात केक कापला होता. हा केक त्यांनी त्यांची मुलगी आणि पत्नीला देखील खावू घातला. एवढेच नाही तर केक खाताना त्यांनी ‘आता आपल्या सर्वांना पुढील जन्म दिवसाच्या शुभेच्छा असे म्हंटले.
रुग्णालयात जाण्यास दिला नकार
या घटनेची (Suicide) माहिती मिळताच मृत शैलेंद्र कुमार यांचे शेजारी लवकुश यांनी घराच्या दरवाजावरून उडी मारून शैलेंद्र कुमार यांच्या घरात प्रवेश केला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आम्हाला रुग्णालयात जायचे नाही म्हणत विरोध केला. हे ऐकूण आम्हाला देखील आश्चर्य वाटले, मात्र बऱ्याच प्रयत्ननंतर आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल केले. आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन पोहोचलो मात्र त्यानंत काही मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला असे लवकुश यांनी सांगितले आहे.
ऑफीसमधील सहकाऱ्याला दिली होती आत्महत्येची कल्पना
हाती आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी शैलेंद्र कुमार याने केक ऑडर केला होता. हा केक खाण्यापूर्वी त्यांने त्यात विष घातले. त्यानंतर केक कापण्यात आला, त्याने तो केक आपली पत्नी आणि मुलीला खाऊ घातला. केक खाल्ल्यानंतर आपल्या सर्वांना पुढील जन्म दिवसाच्या शुभेच्छा असे तो म्हटला. त्यानंतर काही तासांमध्येच त्या तिघांचा मृत्यू झाला. यादरम्यान मृत शैलेंद्र कुमार याने आपण आत्महत्या (Suicide) करत असल्याची कल्पना आपल्या ऑफिसमधील सहकार्याला दिली होती. यानंतर मृत शैलेंद्र कुमार यांच्या सहकाऱ्याने याची माहिती पोलिसांना दिली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान
आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे
नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार