अफवांना बळी पडू नका! परभणी जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

0
51
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

२१ दिवसाच्या लॉगडाऊनच्या काळात जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा आणि अन्न धान्याचा साठा मुबलक असून कोणताही तुटवडा होणार नाही याची प्रशासनाने काळजी घेतलेली आहे. जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि अन्नधान्य, भाजीपाला यांची दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार असल्याने नागरीकांनी नाहक गर्दी करु नये व अफवांना बळी पडु नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नागरीकांनी काही अडचण असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२४५२ २२६२४४ व्हॉटसअप क्रमांक – ७७४५८५२२२२ व आपत्ती प्रशासन कक्षातील दूरध्वनी क्रमांक ०२४५२ – २२६४०० येथे संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here