हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात हिवाळा सुरू होताच कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र आणि केरळनेही याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मुंबईतच गेल्या ३ दिवसांत 150 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातच कोरोनाच्या नवा बी बी सब-व्हेरिएंटचा रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याने खळबळ उडाली आहे.
नुकतंच राज्यात 477 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 178 मुंबईत आहेत. कोविडच्या नवीन XBB सब-व्हेरियंटचा एक रुग्णही महाराष्ट्रात आढळून आला आहे. यामुळे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दिवाळीच्या आधी आणि नंतर वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंटची लक्षणे शरीरदुखीचे सोबतच सर्दी सुद्धा असू शकते.
दरम्यान, मागील आठवड्यात चीनमध्ये ओमिक्रॉनच्या २ नव्या व्हेरिएन्टने खळबळ उडवली आहे. BF.7 आणि BA.5.1.7 असे या नव्या व्हेरिएन्टचे नाव आहे .येत्या काही दिवसात लवकरच थंडी पडेल त्यामुळे BF.7 व्हेरिएन्ट धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . फक्त चीनमध्येच नव्हे तर बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क आणि इंग्लंडमध्येही तो वेगाने पसरत असल्याची बातमी आहे