ShivSena : पिकविमा ओला दुष्काळाच्या मागणीसाठी शिवसेनेचा पाथरीत रास्तारोको; राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प
परभणी प्रतिनिधी | ShivSena : शिवसेनेच्या वतीने ओला दुष्काळ व पिकविमा मागणीसाठी परभणी जिल्ह्यात बुधवारी ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी परभणीत आंदोलनाचे नेतृत्व करत असताना परभणीचे आ. राहुल पाटील यांनी जिल्ह्यात जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर करत पिक विमा देण्यात येणार नाही तोपर्यंत विधानसभेचे सत्र सुरू होऊ देणार नाही ! असा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील पाथरी शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर सेलू कॉर्नर येथे 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान रास्ता रोको करण्यात आला. यावेळी माजलगाव, सेलू परभणीकडे जाणारी वाहतुक ठप्प झाली होती. सेलू कॉर्नर परिसर शिवसैनिकांनी सरकार विरोधी घोषणाबाजी करून दणाणून सोडले होते. सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर तहसील समोर ओला दुष्काळ व पिक विमा मागणीसाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणकर्त्यांची भेट घेत यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. ShivSena
दरम्यान प्रशासनाकडून आंदोलन ठिकाणी जात नायब तहसीलदार एस.बी कट्टे यांनी मागण्याचे निवेदन स्विकारले. पोलीसांकडून मोठा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता. यावेळी आंदोलनामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे , मा. जि.प सदस्य माणिकअप्पा घुंबरे, रंगनाथ वाकणकर, उपतालुका प्रमुख रावसाहेब निकम, बालासाहेब शिंदे, सत्यनारायण घाटूळ, माऊली गलबे, अनंता नेब, शरद कोल्हे, ज्ञानेश्वर शिंदे, रणजित गिराम, तुकाराम हारकळ, रामचंद्र आम्ले, पांडूरंग शिंदे, अविराज टाकळकर, सिध्देश्वर इंगळे, राजु नवघरे, कृष्णा शिंदे, किसन रणेर, सुरेश नखाते, सुर्यकांत नाईकवाडे, प्रमोद चाफेकर, दिपक कटारे, राधे गिराम, प्रताप शिंदे, जयराम नवले, सुंदर दिवटे, भारत मस्के आदी शिवसेना ( ठाकरे गट), युवासेना पदाधिकारी यांच्या सह तालुक्यातील शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते. ShivSena
हे पण वाचा :
भैरवनाथ संस्था निवडणुक : वारूंजीसह 6 गावातील राजकारण तापले
दोस्तीत कुस्ती!! शिंदे गटाने भाजपचा महामंत्रीच फोडला
भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला; पोलीस बंदोबस्तात वाढ
कापील ग्रामसभेत सत्ताधारी- विरोधकांच्यात राडा : सदस्याची कपडे फाडली
त्यावेळी उध्दव ठाकरेंच्या आदेशाने आम्हांला धक्का बसला : आ. शंभूराज देसाई