हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO : नोकरी करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. वास्तविक, नियोक्त्याच्या हिश्श्याचा एक भाग EPFO च्या पेन्शन योजनेमध्ये जमा केला जातो. यामध्ये कर्मचाऱ्याकडून कोणतेही योगदान दिले जात नाही. आज आपण EPFO द्वारे ऑफर केलेल्या पेन्शन योजनेबाबतची काही तथ्ये जाणून घेउयात …
1. कोणताही कर्मचारी EPF सदस्य झाल्याशिवाय पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार दरमहा किमान 15,000 रुपये असेल, तर तो PF योजनेच्या पॅरा 26(6) च्या तरतुदींनुसार EPF चा सदस्य होऊ शकतो.
2. पेन्शन फंडमध्ये नियोक्त्याद्वारे योगदान दिले जाते. अशा परिस्थितीत, कोणताही EPF सदस्य कर्मचारी पेन्शन कंपोनंटमध्ये योगदान देण्यास नकार देऊ शकत नाही.
3. जर एखादा कर्मचारी वयाच्या 58 व्या वर्षी कोणत्याही संस्थेत सामील झाला तर तो पेन्शन फंडाचा सदस्य होता येणार नाही.
4. इंडिविजुअल मेंबर पेन्शन योजनेतून सूट घेऊ शकत नाहीत, मात्र एखादी कंपनी सूट मागू शकते.
5. सदस्य वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्तीनंतर पेन्शनसाठी पात्र असतो. जर कर्मचाऱ्याने 50 ते 57 वर्षांच्या दरम्यान नोकरी सोडली तर त्याला लवकर (कमी) पेन्शनचा लाभ मिळू शकतो.
6. पेन्शनची रक्कम मोजण्याचे सूत्र खालीलप्रमाणे आहे –
पेन्शन = (पेन्शनपात्र पगार) (गेल्या 60 महिन्यांची सरासरी) X पेन्शनपात्र सेवा / 70
7. सदस्याच्या मृत्यूनंतर, कुटुंब पेन्शन आणि मुलांचे पेन्शन 1 महिन्याच्या योगदानाच्या डिपॉझिट्सवर देखील देय आहे.
8. EPFO सदस्याच्या मृत्यूनंतर, पेन्शन त्याच्या पत्नी किंवा पतीला दिली जाईल.
9. मुले 25 वर्षे वयापर्यंत पेन्शन मिळवण्यास पात्र आहेत.
10. पेन्शनधारकाला देशात कुठेही पेन्शन मिळू शकते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
PM Kisan योजनेचा 12 वा हप्ता कधी मिळणार ???
Multibagger Stock : ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिला मोठा नफा !!!
‘या’ 5 चुकांमुळे थांबवला जाऊ शकतो ITR Refund !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन भाव तपासा
कर्ज आणखी महागणार!! रेपो रेट मध्ये पुन्हा वाढ