हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO च्या सदस्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या ग्राहकांसाठीच्या सुविधा आणि सेवांमध्ये सातत्याने वाढ करत आहे. या अंतर्गत ईपीएफओ च्या सर्व सेवा आता डिजीलॉकरवरही उपलब्ध असतील. मात्र, यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर Digilocker App डाउनलोड करावे लागेल.
ईपीएफओ ने ट्विट करून ही माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये म्हटले गेले आहे की,” ईपीएफओ सदस्य Digilocker द्वारे UAN कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) आणि स्कीम सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात.” याआधीही ईपीएफओ ने ही माहिती दिली होती.
EPFO WEBSITE : https://epfindia.gov.in/
डिजिलॉकर कसे वापरायचे ?
यासाठी वेबसाइटवरून किंवा त्यांच्या स्मार्टफोनवरून Digilocker App डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन द्वारे यूझर आयडी तयार करा. आपले डॉक्युमेंट्स एक्सेस करण्यासाठी, आपल्याला आधार नंबर आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकून लॉग इन करावे लागेल. आता रजिस्टर्ड मोबाईलवर OTP येईल. हा OTP टाकल्यानंतर Digilocker द्वारे EPFO च्या सुविधा वापरता येईल.
सुविधा कशा मिळतील ?
कर्मचाऱ्यांना पहिले या प्लॅटफॉर्मवर EPFO च्या UAN कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि Digilocker वर उपलब्ध स्कीम सर्टिफिकेट यांसारख्या सेवांसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचे व्हेरिफिकेशन करावे लागेल. यानंतर डॉक्युमेंट्स Digilocker मध्ये ठेवावे लागतील.”
हे पण वाचा :
EPFO कडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा, आता लाइफ सर्टिफिकेट कधीही सादर करता येणार
EPFO ने ग्राहकांना दिली मोठी सुविधा, आता घरबसल्या इतर खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करता येणार
EPFO शी पॅन लिंक करून वाचवता येईल अतिरिक्त TDS, लिंक कसे करावे ते पहा