लोकशाहीमध्ये कोणाला कोठेही लढण्याचा अधिकार; नवनीत राणा प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहार. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर खासदार नवनीत राणा व रवी राणा यांच्याकडून निशाणा साधला जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष पहायला मिळत आहे. अशात राणा दांपत्यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्यानंतर यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लोकशाहीमध्ये कोणाला कोठेही लढण्याचा अधिकार आहे”, असे सुळे यांनी म्हंटले आहे.

सातारा येथे आज कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी निमित्त आयोजित पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, माझ्यावर खासदार म्हणून जबाबदारी आहे. आणि आता सर्वात मोठा प्रश्न हा महागाईचा आहे. त्यामुळे खासदार म्हणून असलेली जबाबदारी आणि महागाई ही मोठी दोन आव्हान राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत.

https://www.facebook.com/watch/?v=364746025467852

विधवा महिलांबाबत ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या हेळवाककरांचा सत्कार

यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील हेळवाड या गावाने विधवा महिलांच्या बाबतीत ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल गावातील सरपंच, महिलांचे खा. सुप्रिया सुळे यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांचा सत्कारही केला. यावेळी शाहु महाराजांना अभिमान वाटेल असे काम या गावाने केले आहे. या निर्णयाबाबतचा कायदा करावा लागेल. महाविकास आघाडीच सरकार पुरोगामी विचाराच सरकार आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे, असे कौतिकास्पद उद्गार सुळे यांनी काढले.

नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांना काय दिले आहे आव्हान?

लीलावती रुग्णालायतून डिस्चार्ज भेटल्यानंतर अमरवती खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तुमच्यात तर दम असेल तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा असे खुले आव्हान त्यांनी उद्धव ठाकरेंना मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.

Leave a Comment