हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पीएफचे व्यवस्थापन EPFO कडून केले जाते. हे जाणून घ्या की, नोकरी करणाऱ्या लोकांच्या पगाराचा काही भाग दरमहिन्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये जमा केला जातो. EPFO हे पूर्णपणे जोखीममुक्त तर आहेच त्याचबरोबर त्याचे व्याज देखील इतर गुंतवणूक करणाऱ्या संस्थांपेक्षा जास्त असते. कर्मचाऱ्यांना पीएफच्या रकमेवर व्याज देण्यासाठी ईपीएफओ कडून अनेक ठिकाणी हे पैसे गुंतवले जातात. यामध्ये शेअर्स आणि शेअर्सशी संबंधित उत्पादनांचा देखील समावेश आहे.
EPFO कडून शेअर्समध्ये किती पैसे गुंतवले जातात ? याबाबत 8 ऑगस्ट रोजी श्रम आणि रोजगार मंत्रालया कडून लोकसभेत माहिती दिली. यावेळी कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सांगितले की,” ईपीएफओ आपल्या फंडींगपैकी 85 टक्के फंडस् डेट इंस्ट्रूमेंटमध्ये गुंतवते. तर 15 टक्के फंड हा एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) मध्ये गुंतवला जातो. यासाठी सरकारकडून एक गुंतवणुकीचा पॅटर्न ठरवण्यात आलेला आहे. लोकसभेतील एका प्रश्नाच्या उत्तरात मंत्रालयाने ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की,” 2019-20 या आर्थिक वर्षात EPFO ने एकूण 2,20,236.47 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यापैकी 31,501.09 कोटी रुपये हे ETF मध्ये गुंतवले गेले होते. तर 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये, ईपीएफओ ने एकूण 2,18,533.88 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, त्यापैकी 32,070.84 कोटी रुपये हे ETF मध्ये गुंतवले गेले. ईपीएफओ ने 2021-22 मध्ये (जून 2022 पर्यंत) एकूण 84,477.67 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, त्यापैकी 12,199.26 कोटी रुपये ETF मध्ये गुंतवले आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
FD Rates : श्रीराम सिटी युनियनने आपल्या FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
Multibagger Stock : गेल्या 21 वर्षात ‘या’ शेअर्सद्वारे गुंतवणूकदारांनी मिळवले कोट्यवधी रुपये !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजच्या किंमती पहा
Whatsapp वर तुम्हांला कोणी ब्लॉक केलंय?? ‘अशा’ पद्धतीने करा चेक