हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO : 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेली कोणतीही संस्था अथवा कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये खाते उघडणे बंधनकारक आहे. या खात्यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांकडूनही योगदान दिले जाते. यामध्ये रजिस्टर्ड असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक पीएफ खाते क्रमांक दिला जातो. मात्र पीएफ खाते क्रमांकामध्ये इंग्रजी अक्षरे का असतात??? याचा विचार आपण कधी केला आहे का ???
तर हा अल्फान्यूमेरिक नंबर आहे, ज्याद्वारे पीएफ खात्याबाबत काही विशिष्ट माहिती दिली जाते. तसेच हा नंबर डीकोड करून कोणत्याही व्यक्तीला पीएफ खात्याशी संबंधित काही खास गोष्टींची माहिती जाणून घेता येते. अल्फान्यूमेरिक नंबरमधील अंक आणि अल्फाबेट्सचा एक विशिष्ट असा अर्थ आहे. याद्वारे आपले राज्य, प्रादेशिक कार्यालय, कंपनी आणि पीएफ मेंबर कोडची माहिती मिळते. EPFO
अशाप्रकारे करा डीकोड
हे जाणून घ्या कि, कोणत्याही पीएफ खात्याचा अल्फान्यूमेरिक नंबर डीकोड करण्यास खूप सोपा आहे. जर एखाद्याचा पीएफ खाते क्रमांक MH BAN 0056774 000 0000681 असेल. तर यातील
MH म्हणजे महाराष्ट्र राज्य
BAN म्हणजे- बांद्रा येथील प्रादेशिक कार्यालय
0056774- हा क्रमांक कंपनीचा एस्टॅब्लिशमेंट ID आहे.
यानंतर पुढील 3 अंक एस्टॅब्लिशमेंट एक्स्टेंशन आयडी असतील. हे अंक 000 असेल तर एक्सटेंशन मिळालेले नाही.
आता पुढील उर्वरित 7 अंक म्हणजे 0000681 मेम्बर किंवा एम्प्लॉई आयडी आहेत. EPFO
पीएफ खाते क्रमांक विसरला तर…
आता जर पीएफ खाते क्रमांक विसरला असाल तर आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. तो पुन्हा मिळवता येईल. हे लक्षात घ्या कि, बहुतेक नियोक्त्यांकडून सॅलरी स्लिपवरच कर्मचार्यांचा पीएफ खाते क्रमांक दिला जातो. तसेच जर आपल्याकडे PF चा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) असेल आणि तो ऍक्टिव्ह झाला असेल, तर या EPFO सदस्यांच्या मदतीने पासबुक पोर्टलवर लॉगिन करूनही PF खाते क्रमांक मिळू शकेल. इथे जो मेम्बर आयडी असेल तोच आपला खाते क्रमांक आहे.
याबरोबरच UMANG APP द्वारे देखील पीएफ क्रमांकाची माहिती घेता येऊ शकेल. हे खाते कंपनीकडून उघडले गेले असल्याने त्यामध्ये आपला पीएफ खाते क्रमांक नक्कीच असेल. त्यामुळे आपल्याला कंपनीकडून खाते क्रमांक मिळू शकेल. यानंतर आपल्याला EPFO प्रादेशिक कार्यालयाच्या तक्रार कक्षात जाऊन तक्रार निवारण फॉर्म भरून आपला खाते क्रमांक जाणून घेता येऊ शकेल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ 2 मोठ्या बँकांच्या FD वरील व्याजदरात बदल, नवीन दर तपासा
Suryoday Small Finance Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा !!!
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ तर चांदीच्या दरात घसरण; पहा आजचे भाव
Bank Holiday : पुढील महिन्यात 21 दिवस बँका राहणार बंद !!! सुट्ट्यांची लिस्ट पहा