हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच आनंदाची बातमी आली आहे. कारण आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत जास्त पेन्शनसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या अंतर्गत आता कर्मचाऱ्यांना 3 मार्च 2023 रोजी किंवा त्याआधीच जास्त पेन्शनची निवड करता येईल. इथे हे लक्षात घ्या की, 31 ऑगस्ट 2014 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या आणि ज्यांनी EPS अंतर्गत जास्त पेन्शनचा पर्याय निवडलेला नाही, अशा कर्मचाऱ्यांसाठीच फक्त हा पर्याय उपलब्ध असेल.
आता या सर्व कर्मचाऱ्यांना नियोक्ता EPS द्वारे संयुक्तपणे जास्त पेन्शनसाठी अर्ज करता येऊ शकतील. नोव्हेंबर 2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने कर्मचारी पेन्शन (सुधारणा) योजना, 2014 वर शिक्कामोर्तब केले होते. ज्यामध्ये पेन्शनची मर्यादा 6500 रुपयांवरून 15 हजार रुपये प्रति महिना करण्यात आली. यासाठी सदस्य आणि नियोक्त्यांना त्यांच्या बेसिक सॅलरीच्या 8.33% योगदान देण्याची परवानगी देण्यात आली होती.
EPFO ने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आदेश
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत हे निर्देश जारी करण्यात येत असल्याचे EPFO ने म्हटले आहे. याबरोबरच EPFO कडून सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र सदस्यांना जास्त पेन्शनचा पर्याय उपलब्ध करून देण्यास सांगितले गेले आहे. EPFO च्या परिपत्रकानुसार, पात्र कर्मचारी त्यांच्या नियोक्त्यांसोबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त पर्याय सादर करू शकतील.
जास्त पेन्शन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज
अर्ज प्रक्रियेच्या कालमर्यादेबाबतची आणखी माहिती विभागीय पीएफ आयुक्तांद्वारे लवकरच दिली जाणार आहे.
पात्र कर्मचार्यांना त्यांच्या नियोक्त्यासोबत संयुक्त निवेदन इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रांसह आयुक्तांनी विहित केलेल्या अर्जामध्ये वाढीव लाभासाठी संयुक्तपणे अर्ज करावा लागेल.
परिपत्रकात असे म्हटले गेले आहे की, अर्ज करण्यासाठी एखाद्याला डिजिटली लॉग इन करावे लागेल, ज्यासाठी EPFO द्वारे एक स्वतंत्र URL सुविधा दिली जाईल.
भविष्य निर्वाह निधीमधून पेन्शन फंडमध्ये एडजस्टमेंट करण्याची आवश्यकता असेल तर संयुक्त स्वरूपात कर्मचार्यांची संमती आवश्यक असेल.
अर्जदाराला अर्जावरील निर्णयाची माहिती देणारा ईमेल/पोस्ट पाठविला जाईल, त्यानंतर SMS देखील पाठविला जाईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज
SBI ‘या’ स्पेशल FD मध्ये गुंतवणुकीची शेवटची संधी !!!! घरबसल्या अशा प्रकारे करा अर्ज
Credit Score म्हणजे काय ??? त्याचे महत्त्व जाणून घ्या
‘या’ 5 कारणांमुळे आपण येऊ शकाल Income Tax डिपार्टमेंटच्या रडारवर, जाणून घ्या त्याविषयीची माहिती
Punjab and Sind Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज