EPFO Rules | प्रत्येक नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील काही रक्कम त्याच्या पीएफ खात्यामध्ये जमा होत असते. आणि हा पीएफ त्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर दिला जातो. परंतु तुम्हाला काही पैसे ट्रान्सफर करायचे असेल, तरी देखील करू शकता. परंतु तुम्ही जर पैसे काढले नाही, तर सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला व्याजासकट खूप चांगले पैसे परत मिळतात. खात्याच्या संबंधित अनेक फायदे असतात. परंतु आता तुम्हाला जास्तीचे पन्नास हजार रुपये मिळणार आहेत. याबाबत पीएफने एक नियम बनवलेला आहे. तो नियम म्हणजे लॉयल्टी कम लाईफ बेनिफिट. या नियमासंबंधी खात्यातून 50 हजार रुपयांचा फायदा घेऊ शकता. आता याच पीएफच्या (EPFO Rules) नियमाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
50 हजार रुपयांचा फायदा कधी मिळतो ? | EPFO Rules
प्रत्येक कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते असते. कंपनी बदलली तरी आधीचे खाते सुरू ठेवावे लागते. तुम्ही तर 20 वर्ष अशा पद्धतीने एकाच पीएफ खात्यामध्ये पैसे भरले. तर तुम्ही या लॉयल्टी कम लाईफ बेनिफिट योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेमध्ये जर तुम्ही वीस वर्षापर्यंत एकाच पीएफ अकाउंटमध्ये वापरत असाल, तर तुम्हाला 50 हजार रुपयांचा बेनिफिट मिळू शकतो.
पगारानुसार किती रक्कम मिळणार?
लाईफ बेनिफिटमध्ये 5 हजार रुपयांपर्यंत सॅलरी असणाऱ्या व्यक्तींना 3 हजार रुपयांचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे 5001 ते 10,000 रुपयांचा पगार असणाऱ्या व्यक्तीने 40 हजार रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे 10 हजारांपेक्षा जास्त सॅलरी असलेल्या व्यक्तींना 50000 रुपयांपर्यंतचा फायदा होणार आहे.
तुम्हाला कसा फायदा होईल? | EPFO Rules
- तुम्ही जरी नोकरी बदलली तरी तुमचे पीएफ खाते तुम्हाला एकच ठेवावे लागेल.
- यासाठी तुम्हाला तुमची सध्याची कंपनी आधीची कंपनी या दोघांना पीएफ खात्याची माहिती द्यावी लागेल.
- नोकरी करत असताना पीएफ खात्यातून पैसे काढू नका.
- त्यामुळे इन्कम टॅक्स आणि रिटायरमेंटच्या वेळी अडचणी येऊ शकतात.
- नोकरी करताना पैसे काढले तर पेन्शन बेनिफिट्स देखील मिळत नाही.