EPFO Update | जे लोक नोकरी करत असतात. ते त्यांच्या भविष्यसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये गुंतवणूक करत असतात. ही एक सरकारी संस्था आहे. जी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी ही संस्था करत असते. अनेक सुविधाही पुरवत असते. भविष्यासाठी दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेमध्ये जाते. ही रक्कम त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना वापरता येते. त्याचप्रमाणे आता ईपीएफओने पीएफ म्हणून पैसे काढण्याची प्रक्रिया देखील अगदी सोपी केलेली आहे. ईपीएफ होण्याचा ऑटोमोड सेटलमेंट सुरू केलेले आहे. त्यामुळे आता सहा कोटींपेक्षा अधिक पीएफ सदस्यांना याचा फायदा होणार आहे. आता सदस्यांना कोणत्याही इमर्जन्सीमध्ये त्यांचा निधी उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत तुमच्या बँक खात्यात तीन दिवसाच्या आत तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहेत.
या ऑटोमोट सेटलमेंट अंतर्गत कर्मचारी त्यांच्या आणीबाणीच्या वेळी पीएफमधून पैसे काढू शकतात. ईपीएफओ त्यांच्या सदस्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैसे काढण्याची परवानगी देखील देते. यामध्ये आपत्कालीन आजारांवर उपचार, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी तुम्हाला पैसे काढून शकता. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून देखील काढू शकता. निधीच्या क्लेम सेटलमेंटसाठी एप्रिल 2020 मध्येच ऑटोमोड सुरू करण्यात आलेला आहे. परंतु त्यावेळी केवळ आजारपणासाठी पैसे काढता येत होते. आता आजारपण, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी देखील तुम्ही ईपीएफओ मधून पैसे काढू शकता. तसेच बहीण आणि भावाच्या लग्नासाठी तुम्हाला पैसे काढता येतात.
पैसे काढण्याची मर्यादा वाढली | EPFO Update
या आधी पीएफमधून (EPFO Update) आगाऊ निधी काढण्याची मर्यादा 50 हजार रुपये होती. परंतु आता ती एक लाख रुपये करण्यात आलेली आहे. ऑटो सेटलमेंट मोडद्वारे ॲडव्हान्स पैसे काढण्याचे काम ऑनलाईन प्रकारे होणार आहे. तीन दिवसाच्या आत तुमच्या खातात पैसे देखील जमा होणार आहे. यासाठी तुम्हाला काही कागदपत्र सबमिट करावी लागतील. यामध्ये केवायसी क्लेम रिक्वेस्ट, एलिजिबिलिटी, बँक अकाउंट डिटेल्स यांसारख्या गोष्टींचा समावेश असेल.
आगाऊ पैसे काढण्याची प्रक्रिया
आगाऊ पैसे काढण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी ईपीएफओ पोर्टलवर लॉगिन करावे लागेल. यासाठी युएएन आणि पासवर्ड गरजेचा आहे.
लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सेवांच्या पर्यायावर जाऊन क्लेम सेक्शन निवडावा लागेल.
त्यानंतर तुमचा बँक अकाउंट व्हेरिफाय करावे लागेल. आणि बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील.
त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटचा चेक आणि पासबुकची प्रत देखील अपलोड करावी लागेल.
त्याचप्रमाणे ज्या कारणासाठी तुम्हाला पैशाची गरज आहे. त्या कारणाचा उल्लेख करावा लागेल.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसात तुमच्या खातात पैसे येतील.