हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) देशभरात अनेक सदस्य आहेत. याद्वारे नोकरदार वर्गाला विविध प्रकारची आर्थिक मदत दिली जाते. PF मध्ये जमा असलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतातच. त्याचप्रमाणे त्यावर चांगले व्याजही मिळते. याद्वारे रिटायरमेंटनंतर पेन्शनचा लाभही मिळेल. तसेच काही नियम आणि अटींचे पालन करून आपल्याला पीएफ खात्यातून पैसेही काढता येतात. मात्र जर आपली नोकरी गेली आणि दुसरी नोकरी मिळायला वेळ लागला तर या अंतरामुळे पीएफ खात्यातून पैसे काढता येतील का ???
EPFO च्या नियमांनुसार, जर आपण जुन्या नियोक्त्यासोबत सलग 4.5 वर्षे काम केले असेल तर दुसरी नोकरी मिळाल्यावर पीएफ खात्याची संपूर्ण रक्कम नवीन नियोक्त्याकडे उघडलेल्या खात्यामध्ये ट्रान्सफर करता येईल. नवीन पीएफ खाते उघडल्यानंतर कर्मचाऱ्याने जुन्या खात्यातून पैसे काढले, तर त्यालाही इन्कम टॅक्स कायद्यात सूट देण्यात आली असून या रकमेवर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही.
या कारणांमुळे पैसे काढण्यावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही
जर कर्मचाऱ्याने नोकरी बदलली असेल आणि जुन्या खात्यातून नवीन नियोक्त्याने उघडलेल्या पीएफ खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील, तर या प्रकरणातही त्याला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही.
जर एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या पीएफ खात्यातून नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच NPS खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर त्याला कोणताही इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही.
जर कर्मचाऱ्याने नियोक्त्यासोबत 5 वर्षे किंवा त्याहून जास्त काळ सतत काम केले असेल तर अशा पीएफ खात्यातून पैसे काढण्यावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही.
जर कर्मचाऱ्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे नोकरी सोडावी लागली असेल किंवा मालकाचा व्यवसाय बंद झाला असेल किंवा कर्मचाऱ्याच्या नियंत्रणाबाहेरील कोणत्याही कारणामुळे नोकरी गेली असेल तर अशा परिस्थितीत पीएफ मधून पैसे काढण्यावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. EPFO
नोकरीमध्ये अंतर असेल तर…
समजा कर्मचारी कपाती दरम्यान नोकरी गेली असेल आणि दुसरी नोकरी मिळवण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला असेल. आणि आता आपण नवीन नियोक्त्यासोबत असाल आणि जुन्या पीएफचे पैसे नवीन खात्यामध्ये ट्रान्सफर करायचे असतील किंवा जुन्या खात्यातून पैसे काढायचे असतील तर इन्कम टॅक्स लागू होईल. अशा परिस्थितीत, नोकरीतील दोन महिन्यांच्या अंतरादरम्यान, पीएफ खात्यावर मिळणारे व्याज हे इन्कम टॅक्सच्या कक्षेत येईल. तसेच हे पैसे काढल्यावर आपल्या स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागेल. EPFO
जर पीएफ खाते उघडून 5 वर्षे झाली असतील तर या खात्यातून काढलेल्या रकमेवर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. इथे हे लक्षात घ्या की, आपण नोकरी करत नसलेल्या दोन महिन्यांत खात्यात मिळालेले व्याज करपात्र असेल, मात्र उर्वरित रक्कम कराच्या कक्षेबाहेर राहील. EPFO
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
Infinix Hot 20 5G फोनवर मिळावा जबरदस्त डिस्काउंट, स्टॉक संपण्यापूर्वी करा खरेदी
Amul सोबत अशा प्रकारे बिझनेस करून दरमहा मिळवा लाखो रुपये !!!
Infinix Hot 20 5G फोनवर मिळावा जबरदस्त डिस्काउंट, स्टॉक संपण्यापूर्वी करा खरेदी
Bank FD : स्मॉल फायनान्स बँका FD वर देत आहे जबरदस्त रिटर्न, पारंपारिक बँकांपेक्षा जास्त फायदे उपलब्ध
रेल्वे स्थानकावर MRP पेक्षा जास्त शुल्क आकारले गेले तर डायल करा ‘हा’ क्रमांक, Railway करेल तात्काळ कारवाई