ESAF Small Finance Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ, असे असतील नवीन व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ESAF Small Finance Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता ESAF Small Finance Bank ने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्ससाठी व्याजदरात वाढ केली आहे.

ESAF Small Finance Bank opens new branch in Chennai – Odisha Diary

12 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू

बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे नवीन दर 12 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. या बदलानंतर, आता बँक सध्या 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या फिक्स्ड डिपॉझिट्स सामान्य नागरिकांना 4.00% ते 5.25% तर ज्येष्ठ नागरिकांना 4.50% ते 5.75% पर्यंतचा व्याज दर देत आहे. त्याच प्रमाणे बँक आता 999 दिवसांच्या कालावधीसाठी (2 वर्षे 8 महिने आणि 25 दिवस) सामान्य नागरिकांना 8.00% तर ज्येष्ठ नागरिकांना 8.50% जास्तीत जास्त व्याज दर देत आहे. ESAF Small Finance Bank

Kerala-based ESAF Small Finance Bank looks to raise ₹998 crore through IPO  | Business Insider India

ESAF Small Finance Bank चे व्याजदर जाणून घ्या

आता बँक 7 ते 14 दिवसांच्या FD वर 4.00% तर 15 ते 59 दिवसांच्या FD वर 4.50% व्याजदर देत आहे. त्याच प्रमाणे 60 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर आता 5.00% आणि 91 दिवस ते 182 दिवसांच्या FD वर 5.25% दराने व्याज मिळेल.

तसेच आता ESAF Small Finance Bank 183 दिवस आणि 1 वर्षाच्या FD वर 5.50%,1 वर्ष आणि 1 दिवस आणि 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 7.50%, 2 वर्ष ते 998 दिवसांच्या FD वर 7.75%, 999 दिवसांच्या (2 वर्षे 8 महिने 25 दिवस) FD वर 8.00% व्याजदर देत आहे.

त्याच प्रमाणे 1000 दिवस ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सध्या 7.75%, 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.75%,पाच ते दहा वर्षांच्या मुदतीच्या FD वर 5.25% दराने व्याज मिळेल. हे लक्षात घ्या कि, बँकेकडून FD च्या सर्व कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरांपेक्षा 50 bps चा अतिरिक्त दर मिळत राहील.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.esafbank.com/account/fixed-deposit/

हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये