युरोपियन जोडप्याने भारतातील नाकारलेल्या दोन बहिणींना घेतले दत्तक; दिला पालकत्वाचा दर्जा

सतना | अंतरराष्ट्रिय महिला दिनादिवशी दोन मुलींना त्यांच्या डोक्यावर आई वडीलांची सावली मिळाली आहे. युरोपच्या माल्टा शहरातून एका दांपत्याने निशा आणि मनीषा या दोन बहिणींना दत्तक घेतले आहे. त्यासाठी ते सतना येथे पोहचले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी त्यांना आई -वडीलांचा दर्जा दिला आहे.

निशा आणि मनीषा या दोन्ही बहिणींच्या आई – वडिलांना टीबी होता. त्यामध्येच त्यांचे निधन झाले. दोन्ही मुलींनाही टिबी झाला होता. यामुळे त्यांना कोणीही दत्तक घेत नव्हते. निशा ही सहा वर्षाची आहे तर मनीषा ही तीन वर्षाची आहे. जागतिक महिला दिनादिवशी दोन्ही मुलींना पालक मिळाल्याने त्यांचे भविष्य सुरक्षित होणार आहे. ती संपत्ती दोघा बहिणीसाठी देवदूत बनून आल्यासारखे असल्याचे बोलले जात आहे.

दोन्ही मुलीं दत्तक घेण्यासाठी दोघे दंपत्ती युरोपच्या माल्टा शहरातून जबलपूर वरून सतना येथे पोहचले. सतना न्यायालयाच्या आदेशानंतर ते मुलींना घेऊन दिल्ली एम्बसिमध्ये पोहचले. कायदेशीर पालकत्वाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते दिल्लीवरून युरोपसाठी रवाना झाले. दोन मुलींना दुःखाच्या प्रसंगी आणि अजारपणामध्ये गरजेच्या वेळी पालक मिळाल्याने समाजामधून आनंद व्यक्त केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.