विसापूर येथे वृध्द पती-पत्नीच्या खूनाने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खटाव तालुक्यात विसापूर गावात एका वृध्द दाम्पत्यांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. हनुमंत निकम (वय-70) आणि त्याची पत्नी कमल हनुमंत निकम (वय -65 ) असे खून झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. विसापूर गावात या भयंकर घटनेमुळे खळबळ उडाली. या खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपसा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या खूनाची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

पुसेगाव पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गावचे पोलीस पाटील प्रल्हाद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार वृद्ध पती- पत्नीचा खून दोन दिवसापूर्वी झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शनिवारी दिवसभर घराला बाहेर दरवाजाला कडी होती. दोन दिवसात या घरातून कोणतीच हालचाल झाली नाही. दरवाजा उघडला का गेला नाही म्हणून शेजारच्यांनी आणि नागरिकांनी निकम परिवाराच्या घराची कडी उघडली. तेव्हा दोघेही पती-पत्नीचा मृतदेह जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आले. दोघांच्याही मृतदेहाच्या नाका तोंडातून रक्त येत होते.

सदर घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गावकऱ्यांच्या निदर्शनास आली. गावचे पोलीस पाटील सावंत यांनी पुसेगाव पोलीस स्टेशन मध्ये या घटनेची माहिती दिली. तात्काळ पुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घराची तपासणी करत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेनासाठी सातारा येथे पाठवण्यात आले. वृध्द पती- पत्नीचा दोघांचा खून नक्की कोणी केला आहे, हे अद्यापही उघड झाले नाही. खून कोणत्या कारणासाठी केला गेला आहे. याचा तपास पुसेगाव पोलीस शिताफीने करत आहे.