Exclusive: पाकिस्तानातील सरकार आणि लष्करातील वाद शिगेला, इम्रान खानची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी निश्चित ?

नवी दिल्ली । पाकिस्तानमध्ये ISI या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाच्या नियुक्तीवरून सरकार आणि लष्कर यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. आता पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याला पदावरून हटवण्याच्या तयारीत लष्कर असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. 20 नोव्हेंबर रोजी लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम ISI चा डीजी म्हणून पदभार स्वीकारणार आहे. यावरूनक इम्रान खान आणि लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. ISI प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांना या पदावर कायम ठेवावे, अशी बाजवा यांची इच्छा आहे.

सूत्रांनी इम्रान खानसमोर दोन पर्याय असल्याची माहिती दिली आहे. पहिला पर्याय म्हणजे 20 नोव्हेंबरपूर्वी इम्रानने स्वतः पदाचा राजीनामा द्यावा आणि दुसरा पर्याय म्हणजे विरोधी पक्ष संसदेच्या सभागृहात बदल करतील. या दोन्ही पर्यायांमध्ये इम्रानचे जाणे निश्चित आहे. सूत्रांनी असेही म्हटले आहे की, येत्या आठवड्यात पाकिस्तानचा सत्ताधारी पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ आणि त्यांचे दोन सहयोगी पक्ष मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (MQM) आणि पाकिस्तान मुस्लिम लीग त्याची साथ सोडू शकतात.

पीटीआयचे परवेझ खटक आणि पाकिस्तान मुस्लिम लीगचे शाहबाज शरीफ यांची संभाव्य पंतप्रधानपदासाठी प्रमुख नावे असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. गेल्या आठवड्यात, पाकिस्तान सरकारने तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) च्या शेकडो समर्थकांची सुटका केली. जेणेकरून हिंसक निदर्शने थांबवता येतील. हा गट पाकिस्तान सरकारचा निषेध करत होता. त्यात एप्रिलमध्ये अटक करण्यात आलेला आपला नेता साद रिझवी याला सोडावे, अशी मागणी करण्यात आली होती.

ऑक्टोबरमध्ये, CNN-News18 ने बातमी दिली होती की, लष्कर TLP आणि पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारमध्ये तणाव निर्माण करत आहे. इम्रानला बॅकफूटवर आणणे हा त्यांचा उद्देश होता. लेफ्टनंट नदीम अंजुम यांची नियुक्ती करण्यात दिरंगाई आणि त्याला ISI चा डीजी बनवल्यामुळे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा सरकारवर नाराज असल्याने हे सर्व घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

You might also like