नवी दिल्ली । दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा समारोप सोहळा ‘बिटींग द रिट्रीट’ सुरु असताना तिथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या इस्रायलच्या दुतावासाजवळ अत्यंत कमी तीव्रतेचा स्फोट झाला. या स्फोटाचे पडसाद आता इस्रायलमध्ये उमटले आहेत. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही दहशतवादी घटना असल्याचं म्हटले आहं. खळबळ उडवून देण्यासाठी कोणीतरी हे काम केलं असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दरम्यान, सरकारी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहे. इस्रायलच्या सर्व संस्थांची आणि दुतावासांची सुरक्षा वाढवली आहे. तसंच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांना माहिती दिली. तर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून चौकशी सुरू आहे. ( israel embassy in delhi )
दरम्यान, इस्रायलच्या दुतावासाजवळ स्फोट हा अत्यंत कमी तीव्रतेचा आयईडी स्फोट होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जवळपास पार्क केलेल्या तीन वाहनांच्या काचा फोडून कोणत्याही मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही. प्राथमिक तपासणीत हा प्रकार खळबळ उडवून देण्यासाठी कोणीतरी ही खोडी केल्याचं दिसून येतंय, असं पोलिसांचं म्हणणं आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव ( delhi police commissioner ) यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या विशेष विभागाकडून याची चौकशी सुरू आहे. आताच्या घडीला यापेक्षा अधिक काही सांगता येणार नाही, असं एस.एन. श्रीवास्तव म्हणाले.
I just visited the scene of crime. Case has been registered and matter is being investigated by Special Cell. We cannot say anything more on this right now: Delhi Police Commissioner SN Srivastava
A low-intensity explosion occurred near the Israel Embassy in #Delhi earlier today pic.twitter.com/O37qCnQn26
— ANI (@ANI) January 29, 2021
इस्त्रायली संस्थांच्या सुरक्षेत वाढ
दिल्लीतील स्फोटाच्या घटनेसंदर्भात परराष्ट्रमंत्री गबी अश्केनजी यांना सतत अपडेट दिली जात आहे. त्यांनी सर्व आवश्यक सुरक्षा उपाय करण्याची सूचना केली आहे. तसंच सर्व देशातील इस्त्रायली दूतावासांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या स्फोटात कोणालाही दुखापत झाली नाही. भारतीय अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत आणि इस्त्रायली अधिकारीही भारताच्या संपर्कात आहेत, असं इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.