धक्कादायक! गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालया बाहेर स्फोटके?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी | भाजपचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाच्या बाहेर स्फोटके आढळल्याचे समजताच जळगावात एकच खळबळ उडाली आहे. सकाळीच ठाण्यात सिद्धीविनायकाचे मंदिर उडवून देण्याची धमकी पोलिसांना मिळाली असताना या नव्या घटनेने महाराष्ट्र् हादरला आहे. स्फोटकाची माहिती मिळताच त्या ठिकाणी दहशतवादी विरोधी पथकाचे बॉम्ब निकामी करण्याचे अधिकारी दाखल झाले आहेत.

गिरीश महाजन यांनी या संदर्भात अदयाप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र एका नंतर एक असा दहशतवादी कार्यवाहीला पूरक घटना घडल्याने महाराष्ट्रात भीतीचे वातावरण पसरत चालले आहे. अशा अवस्थेतच सुरक्षा व्यवस्थे समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान गुप्तचर विभागाच्या वतीने पुण्यावर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. त्यामुळे १९ जुलै पर्यंत पुण्यात हाय अर्लट लागू करण्यात आला आहे.

गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर कोणत्याही प्रकारची स्फोटके आढळली नसल्याचे बॉम्ब निकामे करणाऱ्या पथकाने सांगितले आहे. महाजनांच्या संपर्क कार्यालया बाहेर स्फोटके असल्याची बातमी केवळ अफवा असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर  पोलिसांना निनामी फोन करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही करण्याची मागणी महाजन यांचे स्वीस सहाय्यक  अरविंद देशमुख यांनी केली आहे.

 

Leave a Comment