मोठी बातमी! शिवसेना आमदार अपात्र सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सुप्रीम कोर्टाने आज विधानसभा अध्यक्षांना आणखीन दहा दिवसांचा वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी नवीन वर्षामध्ये होणार आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत निर्णय देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीसाठी आणखीन मुदत मिळाली आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. याप्रकरणी दररोज दोन्ही गटांकडून युक्तिवाद केला जात आहे. परंतु या प्रकरणी निर्णय देण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाकडे आणखीन तीन आठवड्यांची मुदत मागितली होती. त्यांच्या याच मागणीला सुप्रीम कोर्टाने मान्य करत 10 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे आता राहून नार्वेकर यांना 10 जानेवारीपर्यंतचा वेळ मिळाला आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदारा पात्र प्रकरणाच्या सुनावणीसाठी आणि निकाल देण्यासाठी विलंब करत असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घ्यावी असे निर्देश देखील दिले होते. तर या प्रकरणाचा निकाल 31 डिसेंबरपर्यंत देण्यात यावा असे आदेश राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने दिले होते. या आदेशावरूनच सध्या राहुल नार्वेकर यांच्या पुढे याप्रकरणाची सुनावणी सुरू आहे.