Extramarital affair : बायकोच्या बॉयफ्रेंडला घरात आसरा दिला, अन नंतर नको तेच घडलं

Extramarital affair
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्याचं पत्नीवर प्रचंड प्रेम होतं. पत्नीच्या प्रेमात अखंड बुडालेल्या पतीने तिच्यावरील प्रेमापोटी एका बेसावध क्षणी पत्नीच्या बॉयफ्रेंडला घरात राहण्यास आसरा दिला. तिचे विवाहबाह्य संबंध माहित असूनही पोटच्या मुलीसाठी आणि बायकोवरील प्रेमासाठी नवऱ्याने पत्नीच्या बॉयफ्रेंडला घरी आणलं आणि व्हायचं तेच झालं ! एका खून प्रकरणानंतर त्या दुर्दैवी पतीची कहाणी समोर आली. उत्तरप्रदेशातील गाझियाबादजवळील बहरामपूर येथे ही घटना घडली.

गाझियाबादजवळील एका गावात प्रियंका (25) आणि शिवम गुप्ता (26) हे दाम्पत्य रहात होते. शुभमचे आपली पत्नी प्रियंकावर खूप प्रेम होते. प्रियंकाचे विवाहबाह्य संबंध असल्याने मार्च 2023 मध्ये ती आणि तिचा बॉयफ्रेंड गरजन यादव (23) यांनी घरातून पळून जाणं पसंत केलं. या दाम्पत्याला 2 वर्षांची मुलगी होती, तरीही बायको प्रियकरासोबत घरातून निघून गेल्यानंतर शिवम तिला वेड्यासारखा शोधत होता. इकडे प्रियंका उत्तर प्रदेशमधील बलिया शहरात तिचा बॉयफ्रेंड गरजन यादवबरोबर राहू लागली. प्रियंकाने घरातून पळून जाताना आपल्या 2 वर्षांच्या मुलीलाही नेले होते. तब्बल एका महिन्याने शिवमला आपल्या पत्नीचा शोध लागला. शिवमने पत्नीला घरी येण्याची विनंती केली. शिवमची मुलगी पत्नीजवळ असल्याने तो मुलीला भेटायला आतुर झाला होता. आपल्या नवऱ्याचा जीव मुलीत अडकला आहे, हे प्रियंकाला समजले. तिला हे माहित असल्याने तिने पतीशी एक सौदा केला. हा केलेला सौदाच पुन्हा शिवमला महाग पडला.

शिवमने पत्नीसोबत कोणता सौदा केला ?

शिवमने त्याची पत्नी प्रियंकाला घरी येण्याची विनंती केली, पण बॉयफ्रेंडच्या प्रेमात असलेल्या प्रियंकाने पती शिवमशी सौदा केला. तो सौदा होता, पत्नी प्रियंकाचा बॉयफ्रेंड गरजन पती- पत्नीसोबत घरी राहील, तरच घरी येणार असा हट्ट प्रियंकाने केला. पत्नी आणि मुलीवर प्रेम असल्याने शिवमने ही गोष्ट मान्य केला. प्रियंकाचा बॉयफ्रेंड गरजन हा रोजंदारी करीत मजुरी करायचा तर पती शिवम बहरामपुरमध्ये बाईक टॅक्सी चालवत होता. आता पती शिवम, पत्नी प्रियंका आणि पत्नीचा बॉयफ्रेंड गरजन हे तिघेजण भाड्याने एका घरात रहात होते. पती, पत्नी, आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्या प्रेमाचा त्रिकोण घरात तयार झाल्यावर शिवम आणि प्रियंकामध्ये सातत्याने वाद सुरु झाले. प्रियंका आणि शिवम यांच्यात सतत झालेल्या वादाला कंटाळून प्रियंका आणि गरजन यांच्यात शिवमच्या हत्येचा कट शिजला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम सहा महिने त्याची पत्नी व तिच्या बॉयफ्रेंडबरोबर राहत होता. पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडची सलगी वाढलेली पाहून पती- पत्नीमध्ये अनेकवेळा वाद होत होते. अखेर 20 डिसेंबर 2023 च्या रात्री प्रियंकाने शिवम झोपलेला पाहून त्याचा गळा घोटला तर गरजनने याच्यावर चाकूने हल्ला केला. थोड्याच वेळात शुभमचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रियंका व गरजनने शुभमचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून घरापासून जवळच एका झुडपात फेकून दिला. यानंतर दोघांनीही घरी जाऊन घरातील फरशीवरील रक्ताचे डाग धुवून स्वच्छ केले.

असा लागला गुन्ह्याचा छडा

22 डिसेंबर रोजी एका रस्त्याने जाणाऱ्या माणसाला शिवमचा मृतेदह दिसला. पोलिसांनी चौकशी सुरु केली तेव्हा, प्रियंकाने शिवम नाईट शिफ्टसाठी गेला होता असं सांगितलं. गरजन नातेवाईक असून सोबत राहतो असं तिने सांगितलं. पोलिसांनी घराच्या परिसरात सापडलेल्या रक्ताच्या डागांचे परीक्षण फॉरेन्सिक टीमकडे दिले. पोलिसांना प्रियंका आणि तिचा बॉयफ्रेंड गरजनवर संशय आल्यामुळे पोलिसांच्या चौकशीत शुभमच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला.
एसीपी वेव्ह सिटी सलोनी अग्रवाल यांनी या गुन्ह्याचा छडा कसा लागला याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी 500 पेक्षा जास्त घरांत जात मृताची ओळख लागते काय याचा तपास केला. पोलीस प्रियांकाच्या घरी गेल्यानंतर तिने गरजनशी ओळख नसल्याचे नाटक केले होते. पोलिसांनी चौकशी सुरु केली तेव्हा प्रियंकाने सांगितलं की, तिचा पती शिवम नाईट शिफ्टसाठी कामाला गेला आहे. तसेच गरजन नातेवाईक असून आमच्या सोबत राहतो, असे खोटेच सांगितले. पोलिसांना संशय येताच त्यांनी फॉरेन्सिक टीमसह घरातील फरशी व पायऱ्यांवरील पुसलेल्या रक्ताच्या डागांवर चाचणी करून ते रक्त शिवमचे असल्याचे निष्पन्न केले.