हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया कंपनी असलेली मेटाकडून नुकतेच आपल्या Facebook वरील क्रिएटर्ससाठी काही नवीन ‘क्रिएटिव्ह एक्सप्रेशन’ फीचर्स लाँच करण्यात आले आहेत. या नवीन फीचर्समुळे आता फेसबुकवर रील्स बनवणाऱ्या क्रिएटर्सच्या आनंदाचा ठावठिकाणा राहीलेला नाही. याअंतर्गत आता फेसबुककडून रील्सची टाईम लिमिट वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे आता Reels क्रिएटर्सना Facebook वर 90 सेकंदाचे व्हिडिओ तयार करता येतील.
हे ध्यानात घ्या कि, याआधी Facebook वर रील्स तयार करण्यासाठी युझर्सना फक्त 60 सेकंदाचाच टाईम दिला जायचा. मात्र आता कंपनीकडून मेटा फॉर क्रिएटर्स अकाउंटद्वारे या प्रमुख अपडेटबाबत घोषणा करण्यात आली आहे. आता हे टाईम लिमिट वाढल्याने क्रिएटर्सच्या हातात आणखी एक मोठे घबाड लागले आहे. यानंतर आता क्रिएटर्सना आपल्या फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह केलेला एखादा व्हिडिओ देखील अगदी सहजपणे Reels वर अपलोड करता येईल.
फेसबुकचे हे दोन्ही फीचर्स Instagram मधील फीचर्स सारखेच काम करतात. कंपनीने नवीन ग्रूव्ह फीचर्स देखील लाँच केले आहे, जे ऑटोमॅटिकली युझर्सच्या व्हिडिओमधील मोशनला गाण्याच्या तालावर सिंक करते.
या नवीन टेम्प्लेट्स टूलद्वारे आता युझर्सना ट्रेंडिंग टेम्प्लेट्ससहीत सहजपणे Reels तयार करता येतील. गेल्या महिन्यातच, Meta ने जाहीर केले होते की, ते रील्स क्रिएटर्सना जाहिराती देण्यासाठी मशीन लर्निंग मॉडेल्सचा वापर कसा केला जाईल याबाबत आणखी पारदर्शकता आणण्यासाठी Facebook च्या Why Am I Seeing This Ad? च्या अपडेटवर काम करत आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.facebook.com/
हे पण वाचा :
New Business Idea : उन्हाळ्याच्या दिवसांत ‘या’ वस्तूची विक्री करून मिळवा भरपूर नफा
BSNL चा ‘हा’ प्लॅन खूपच फायदेशीर, पण रिचार्ज करावा की नाही ते जाणून घ्या
Multibagger Stock : तोट्यात असूनही टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सने पकडला वेग
लवकरच मुंबई-गोवा मार्गावरही धावणार Vande Bharat Train, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
Yes Bank चे गुंतवणूकदार गोंधळात, 3 वर्षांनंतर पुन्हा पाहावे लागणार तेच दिवस ???