Bitcoin-Dogecoin ला टक्कर देण्यासाठी, Facebook यावर्षीच लाँच करणार आपली क्रिप्टोकरन्सी Diem; त्याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सोशल मीडिया दिग्गज फेसबुक क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये एंट्री घेणार आहे. यावर्षी (2021) मध्ये फेसबुक आपली क्रिप्टोकरन्सी Diem लाँच करण्याची तयारी करत आहे. सन 2019 मध्ये फेसबुकने ही क्रिप्टोकरन्सी लिब्रा या नावाने लॉन्च करण्याचे ठरवले होते, परंतु आता त्याचे नाव बदलले आहे. Diem च्या माध्यमातून, फेसबुकला फिनटेक स्पेसमध्ये क्रांती घडवायची आहे आणि कंपनीचे म्हणणे आहे की,” या क्रिप्टोकरन्सी मधून पैसे ट्रान्सफर करणे फोटो पाठविण्याइतकेच सोपे जाईल.”

Bitcoin मोठ्या प्रमाणात नुकसानीत चालला आहे
Bitcoin ची किंमत सतत कमी होत असताना फेसबुकने ही घोषणा केली आहे. टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी याक्षणी बिटकॉइनमार्फत टेस्ला कारची खरेदी थांबविण्याच्या घोषणेनंतर बिटकॉईनच्या किंमतींना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, मस्कच्या DogeCoin मध्ये गुंतवणूक करण्याविषयी देखील चर्चा झाली आहे, तसेच त्यांनी क्रिप्टोकरन्सी मायनिंग बाबतही संकेत दिले आहेत. म्हणजेच ते स्वतःची क्रिप्टोकरन्सी आणू शकतात.

Bitcoin-Dogecoin ला स्पर्धेला सामोरे जावे लागेल
कोरोना साथीच्या काळापासून ‘क्रिप्टोकरन्सी’ हा शब्द जागतिक बाजारपेठेमध्ये खूपच पसरला जात आहे. जगभरात व्हायरस आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या प्रसारामुळे डिजिटल परिवर्तन घडले ज्यायोगे ग्राहक आणि व्यावसायिक दिग्गजांमधील ई-कॉमर्स व्यवहाराचा वापर वाढला. इतर डिजिटल चलनांपेक्षा बिटकॉइन, डॉगकॉइन आणि इथेरियम क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये वर्चस्व गाजवत आहेत. अशा परिस्थितीत फेसबुक धमाल करण्यास तयार आहे.

फेसबुकची क्रिप्टोकरन्सी Diem बद्दल जाणून घ्या …
फेसबुक ही क्रिप्टोकरन्सी दोन सेटमध्ये लाँच करू शकते. यापैकी एक मल्टी करन्सी कॉइन असेल आणि दुसर्‍या सेटचे डॉलर आणि युरोमध्ये विशिष्ट फेस व्हॅल्यू असेल. Diem च्या माध्यमातून मनी ट्रान्सफर वर ट्रान्सफर शुल्क खूप कमी असेल, जेणेकरून मोठ्या संख्येने लोक या करन्सीकडे आकर्षित होतील. फेसबुक त्याच्या डिजिटल चलनातील प्रॉजेक्ट ग्रुप Diem Association च्या सहकार्याने Diem लॉन्च करेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group