Sunday, May 28, 2023

पुराचा धोका टाळण्यासाठी जलसंपदामंत्री झाले अलर्ट ; घेतली आढावा बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात अगोदरच कोरोनाचे संकट असताना आता पावसाळाही जवळ आलेला आहे. तर चक्रीवादळामुळेही पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात महापुराचा फटका हा पश्चिम महाराष्ट्राला बसतो. यंदा मात्र तो बसू नये व त्यात कमी नुकसान व्हावे या दृष्टीने राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील अलर्ट झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी नुकतीच पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयात संभाव्य पूर नियंत्रणाबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आहे.

पुणे येथे घेतलेल्या आढावा बैठकीत मंत्री पाटील यांनी कृष्णा-भिमा खोऱ्यातील भागात राहणाऱ्या नागरिकांना पूराचा त्रास होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट करावा, अशा सूचना दिल्या. तसेच पावसाळ्याच्या अनुषन्गाने प्रशासनाकडून कोकोनत्या उपाययोजना हत्ती घेण्याचे काम केले आहे. त्याचीही माहिती जलसंपदामंत्री पाटील यांनी घेतली.

या बैठकीनंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील याची माहिती ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून दिली. ते म्हणाले, “पश्चिम महाराष्ट्रात संभाव्य पूराचा धोका टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, पावसाच्या अतिरिक्त पाण्याचे नियोजन आदीचा आढावा घेतानाच शेजारच्या राज्यांशीही चर्चाही सुरू आहे आणि पावसाळा सुरू होण्याआधीही बैठका घेतल्या जातील,” असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.