बेस्टच्या आवारात असणार ‘या’ सुविधा; पार्किंग, चार्जिंग आणि निवासी हब असेल उपलब्ध

ST Bus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईची लाईफलाईन असलेली बेस्ट ही सध्या आपल्या सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातच बेस्टच्या ताफ्यात एसी डबल डेकरच्या बसेस दाखल होणार आहे. त्यामुळे डबलडेकर बसेस पार्किंग करण्यासाठी तीन डेपोत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. तसेच त्यामध्ये चार्जिंग पॉईंट आणि निवासी हब देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

तीन ठिकाणी बांधले जाणार दुमजली पार्किंग आणि निवासी हब

बेस्टच्या नवीन गाड्यांसाठी दुमजली इमारत बांधण्यासाठी तसेच देवनार, दिंडोशी, वांद्रे या डेपोमध्ये दुमजली पार्किंग आणि निवासी व व्यावसायिक हब बनवण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. दुमजली पार्किंग यासाठी की या नवीन गाड्यांना पार्किंगची समस्या येऊ नये म्हणून त्याची निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे बेस्टच्या नवीन ताफ्याला हवे असणारे वातावरण येथे निर्माण केले जाणार आहे. यामध्ये देवनार व दिंडोशी येथे सी. एन. जी. आहे. मात्र, वांद्रे बस डेपोत सी. एन. जी. ही सुविधा उपलब्ध नाही. मात्र तरीही तिन्ही बस आगारात कॅन्टीनची सुविधा उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर डेपोचा पुनर्विकास करण्यासाठी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच आयएफसी ही वर्ल्ड बँकेची सल्लागार असलेली कंपनी या सर्वांचा अभ्यास करत आहे.

बेस्टच्या बसेसला मिळतेय पसंती

बेस्टच्या बसेसला मुंबईकरांची पसंती एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळत आहे ज्यामुळे या गाड्या पर्यावरणाला पूरक अश्या असाव्यात यासाठी इलेक्ट्रिक बसेसची निर्मिती करण्यात आली आहे. या गाड्या आता बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार असून त्याचा फायदा हा पर्यावर्णासोबतच नागरिकांनाही होणार आहे. हे नक्की.