हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : येत्या आठवड्यात जागतिक कल, आर्थिक डेटाची घोषणा आणि परदेशी गुंतवणूक यासारखे घटक शेअर बाजारावर परिणाम करू शकतात. याच बरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी वाढ आणि कच्च्या तेलाच्या किंमतीवरही शेअर बाजाराचे लक्ष असेल, असे विश्लेषकांनी सांगितले. येत्या आठवड्यात दसरा असल्यामुळे कामकाजाचे दिवसही कमी असतील. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे रिसर्च प्रमुख संतोष मीना यांनी म्हटले की,”गेल्या शुक्रवारच्या तेजीची अपेक्षा करणाऱ्या गुंतवणूकदारांना जागतिक बाजारातून पाठिंबा मिळणे आवश्यक आहे.”
गेल्या आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारांनी जोरदार वाढ पहिली. यावेळी सलग सात दिवसांच्या घसरणीला मागे टाकत बाजाराने जोरदार मुसंडी मारली. यावेळी बीएसई सेन्सेक्स 1,016.96 अंकांनी किंवा 1.80 टक्क्यांनी तर एनएसई निफ्टी 276.25 अंकांनी किंवा 1.64 टक्क्यांनी वाढला. येत्या आठवड्यात बाजाराची दिशा ठरवण्यात संस्थात्मक गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन देखील महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही मीना म्हणाले. त्याच वेळी, ते म्हणाले की,” भू-राजकीय तणाव, अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या काही मॅक्रो-इकॉनॉमिक डेटाची घोषणा, डॉलर निर्देशांकाची दिशा आणि बॉण्ड यील्डवरही लक्ष असेल.” Stock Market
शुक्रवारी वाढ होऊनही बाजार तोट्यातच राहिला
हे लक्षात घ्या कि, गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली. साप्ताहिक आधारावर, सेन्सेक्स 672 अंकांनी किंवा 1.15 टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी 233 अंकांनी किंवा 1.34 टक्क्यांनी घसरला. मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी बाजाराने जबरदस्त उडी घेतली. यावेळी सेन्सेक्स 1000 हून जास्त अंकांच्या वाढीसह बंद झाला. Stock Market
आर्थिक आकडेवारीवर बाजाराची नजर असेल
याचबरोबर काही महत्त्वाच्या मॅक्रो-इकॉनॉमिक डेटावरही बाजार (Stock Market) लक्ष ठेवून असेल. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी PMI चा डेटा देखील सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सर्व्हिस सेक्टरशी संबंधित डेटाही गुरुवारी जाहीर केला जाणार आहे. रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष (रिसर्च) असलेले अजित मिश्रा म्हणाले की, “या आठवड्यात वाहन विक्री, मॅन्युफॅक्चरिंग PMI आणि सर्व्हिस PMI सारख्या महत्त्वाच्या डेटावर लक्ष केंद्रित करून नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे. याशिवाय विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा कल, चलन आणि कच्च्या तेलाच्या हालचालींवरही ट्रेडर्स लक्ष ठेवून असतील.” कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे अमोल आठवले म्हणाले की,”जागतिक घटकांचा देशांतर्गत बाजारावर परिणाम होत राहील आणि कोणत्याही नकारात्मक बातम्यांमुळे बाजारात आणखी पडझड होऊ शकते.” Stock Market
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/
हे पण वाचा :
Gold Price : सोने-चांदी महागले, या आठवड्यात सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते पहा
Karnataka Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर पहा
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! होम-कार लोन
ICICI Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याजदर तपासा
‘या’ Penny Stock ने गेल्या 10 वर्षात गुंतवणूकदारांना दिला 11,000% रिटर्न