Vande Bharat Express सुरु झाल्यापासून विमान भाड्यात जवळपास 30% घट

0
1
Vande Bharat Express
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसचा (Vande Bharat Express) दबदबा भारतीय  रेल्वेमध्ये वाढतच  चालला  आहे. प्रवाश्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करण्यासाठी वाढती मागणी आणि प्रवासी सेवा सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस  भारताच्या वेगवेगळ्या मार्गांवर चालवली जात आहे. सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आणि लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असल्याने देशातील सर्वसामान्य प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसला पसंती दर्शवत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्यापासून विमान भाड्यात (Airfares) जवळपास 30% घट झाल्याचे एका अहवालात समोर आलं आहे.

विमान भाड्यात जवळपास 30% घट-

यापूर्वी देशातील बहुसंख्य विमान प्रवासी आता मात्र लांबच्या प्रवासासाठी वंदे भारत एक्सप्रेसचा पर्याय अवलंबत आहेत. त्यामुळे विमान प्रवासाचे तिकीट दर  देखील  20-30 % च्या प्रमाणात कमी  झाले आहेत अशी  माहिती प्रवास तज्ञ  देत आहेत. यावर बोलताना सार्वजनिक धोरण विश्लेषक परेश रावल यांनी सांगितले की, हा मॅक्रो डेटा रेल्वेच्या नॉन- फेअर बॉक्समधून महसूल निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. भारतीय रेल्वे मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन  व महत्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवताना दिसत  आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट सुविधा देण्याचा प्रयत्न करताना  दिसत आहे. यातूनच वंदे भारत एक्सप्रेसची सप्टेंबरमध्ये व्याप्ती 77% ते 101% दरम्यान आहे. यामुळे विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या घटताना दिसत आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवाशांचे लिंग आणि वयाच्या आधारावर वंदे भारत ट्रेनच्या मागणीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. या माहितीनुसार, मुंबईहून सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक 31-45 वयोगटातील प्रवासी आहेत. त्यानंतर 15-30 वर्षे वयोगटातील प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. 15 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एकूण 85,600 पुरुष, 57,838 महिला आणि 26 तृतीयपंथी ,1-14 वर्षे वयोगटातील सरासरी सुमारे 5% प्रवाश्यांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे.