अजित पवारांमुळे शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द? चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(sharad Pawar) यांचे राज्यातील वेगवेगळ्या भागात दौरे सुरू आहेत. आज शरद पवार यांचा दौरा सोलापूरमध्ये नियोजित करण्यात आला होता. मात्र काही कारणांमुळे हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी दिली आहे. इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमुळे सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र अजित पवार (Ajit Pawar) देखील हा दौरा रद्द होण्यामागील एक कारण मानले जात आहे.

आज अजित पवार ही सोलापूर जिल्ह्यातील माढाच्या दौऱ्यावर आहेत. परंतु त्यांच्या या दौऱ्याला मराठा समाजाकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. अगोदर आरक्षण द्या आणि मग जिल्ह्यात या अशी मागणी माढातील मराठा समाजाने केली आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील आज अजित पवार माढाला गेले आहेत. त्यामुळे तेथील मराठा बांधवांकडून या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाली याबाबत शंका व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, आज शरद पवार सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आढावा घेणार होते. यासाठी पक्षातील सर्व पदधिकार्‍यांना उपस्थित राहण्याचे देखील आदेश देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, शरद पवार यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर देखील लावले गेले होते.. मात्र अचानक हा दौरा पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे आता या दौऱ्याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. तसेच, आज अजित पवार सोलापूरमध्ये असल्यामुळे शरद पवारांनी हा दौरा रद्द केल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत.