हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबई मॉडेलवरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केले जाऊ लागली आहे. अशात मुंबई मॉडेलबाबत काल भाजप नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी याना पत्र लिहले. तसेच या पत्रातून मुंबई मॉडेलबाबत माहिती दिली. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. “फडणवीस यांना मुंबई मॉडेल पचत नसल्यानेच त्यांच्याकडून खोटी माहिती दिली घेली आहे,” असे मलिक यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करीत देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतचा राग व्यक्त केला. यावेळी ,लीक म्हणाले, “भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी याना एक पत्र लिहले आहे. त्यामध्ये त्यांनी मुंबई मॉडेलबाबत खोटी व चुकीची दिली आहे. वास्तविक त्यांना मुंबई मॉडेलच होणार कौतुक पचनी पडलेले नसल्याने त्यांनी अशा प्रकारे खोटी माहिती देण्याचे काम केले आहे.
जगभर महाराष्ट्राच्या कामाची नोंद लोक घेत आहेत. मुंबई मॉडेलची चर्चा होतेय, हे पचत नसल्याने विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis @INCIndia अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून महाराष्ट्राबद्दल खोटी बातमी पसरवण्याचे काम करत आहेत.
– @nawabmalikncp यांचा आरोप pic.twitter.com/TIseVxWH0L
— NCP (@NCPspeaks) May 16, 2021
फडणवीस यांच्याकडून मुंबई मॉडेलबाबत व महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीबाबत जी खोटी माहिती दिली जात आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि त्यांच्या भाजपशाहीत राज्यात काय परिस्थिती आहे? गुजरातमध्ये तब्बल ७१ दिवसात ६१ हजार कोरोना पॉझिटिव्हची माहिती लपविण्यात आल्याची बातमी आली आहे. गोव्यातही अनेक लोकांचा ऑक्सिजनभावी मृत्यू झाला आहे. तर दोन हजार मृतदेह नदीत फेकण्याचीही घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. ज्या ठिकाणी डबल इंजिनचं सरकार आहे ते विफल झाले आहे, असे पत्रातून तुम्ही पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना दाखवले आहे. फडणवीस तुम्हाला महाराष्ट्रातील चांगले काम पचत नसल्यामुळेच तुम्ही महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा उद्योगच सुरू केला आहे,” अशा शब्दात मलिक यांनी फडणवीसांचा समाचार घेतला.