फॅमिली मॅन मनोज बाजपेयी पुन्हा झळकणार ओटीटीवर; आगामी चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसीरिजच्या दुनियेत अभिनेता मनोज बाजपेयी अव्वल क्रमांकावर आहे. ‘द फॅमिली मॅन २’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेबसीरिजची चर्चा आणि यश दोन्ही परिसीमेवर असताना आता मनोज पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द फॅमिली मॅन २’ सिरीजमधील श्रीकांतची प्रमुख भूमिका मनोज बाजपेयी याने अतिशय सुंदर आणि वास्तवदर्शी साकारलेली आहे. यानंतर आता मनोज अमेझॉन प्राईम नंतर नेटफ्लिक्सवर जादू करण्यासाठी सज्ज झाला आहे. नेटफ्लिक्सवरील एका चित्रपटात तो एकदम हटके अंदाजात दिसणार आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ऑस्कर पुरस्कार विजेते लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जीवन कथेवर आधारित हा एक अँथोलॉजी चित्रपट असणार आहे, अशी माहिती आहे. यामध्ये चार विविध कथा चार दिग्दर्शकांनी विविध शैलीत दिग्दर्शित केल्या आहे. यातील एका कथेमध्ये मनोज बाजपेयी एका गझल गायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘रे’ असे आहे. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला गेला.

या ट्रेलरमध्ये चार कथेमधील प्रमुख भूमिका निभावणाऱ्यांची ओळख करू देण्यात आली आहे. मनोज बाजपेयी व्यतिरिक्त केके मेनन, अली फझल आणि हर्षवर्धन कपूर हे कलाकार चार वेगवेगळ्या कथेचे नायक म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. हा अनोख्या मालिकांचा चित्रपट येत्या २५ जूनला प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता मनोज बाजपेयीच्या या मालिका चित्रपटातील कथेचे नाव ‘हंगामा है क्यों बरपा’ असे आहे. तर केके मेननच्या कथेचे नाव ‘बहरूपिया’, अली फझलच्या कथेचे नाव ‘फॉरगेट’ आणि हर्षवर्धन याच्या कथेचे नाव ‘स्पॉटलाईट’ असे आहे. एकाच चित्रपटात चार वेगवेगळ्या कथांच्या वेगवेगळ्या शैली प्रेक्षकांना एकत्रितपणे पाहायला मिळणार आहेत.

दिग्गज लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सत्यजीर रे यांच्या जीवनाचे भाष्य करणाऱ्या कथेचे चित्रपटात रुपांतर करण्यात आले आहे. श्रीजीत मुखर्जी, अभिषेक चौबे आणि वासन बाला यांनी हा चित्रपट आपापल्या अनोख्या ढंगात दिग्दर्शत केला आहे.

You might also like