सावत्र आईने जाळला १० वर्षाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक शहरात आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका सावत्र आईने आपल्या सावत्र मुलासोबत हे धक्कादायक कृत्य केले आहे. या घटनेत एका महिलेने आपल्या १० वर्षीय सावत्र मुलाचा प्रायव्हेट पार्ट जाळला आहे. या मुलाने आपल्या छोट्या सावत्र भावाला बेडवरून खाली पाडल्यामुळे सावत्र आईने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याला शिक्षा दिली.

हि घटना नाशिकच्या डिंडोरी तालुक्यातील एका गावामध्ये घडली आहे. आरोपी महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे. या प्रकरणात पीडित मुलगा आणि त्याचा दीड वर्षांचा छोटा सावत्र भाऊ बेडवर बसून खेळत होते. खेळत असताना पीडित मुलाने छोट्या भावाला धक्का दिला आणि तो बेडवरून खाली पडला. या गोष्टीचा सावत्र आईला खूप राग आला. यानंतर तिने रागाच्या भरात सावत्र मुलाला मारहाण करत त्याचा प्रायव्हेट पार्ट जाळला आहे.

या घटनेनंतर महिलेचा पती घरी आला तेव्हा त्याला घडलेला सर्व प्रकार समजला. यानंतर पीडित मुलाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित मुलाचा प्रायव्हेट पार्ट २० टक्के भाजला आहे. आता त्याची प्राकृतिक स्थिती स्थिर आहे अशी माहिती सिव्हिल सर्जन किशोर यांनी दिली आहे. यादरम्यान सावत्र आईवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. तसेच तिच्यावर पॉस्को अ‍ॅक्टदेखील लावण्यात आला आहे.

You might also like