पद्मभूषण राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन

Rajan Mishra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीतील सेंट स्टीफन्स रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान यांची प्राणज्योत मालवली. राजन मिश्रा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काही वेळापूर्वी त्यांना ऑक्सीजन बेड मिळावा यासाठी ट्विटरवर काही लोकांनी मागणी केली होती. त्यानुसार संजीव गुप्ता या आयएएस अधिकाऱ्याने प्रयत्न करून त्यांना सेंट स्टीफन्स रुग्णालयात बेड मिळवून दिला होता.

पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. राज्यात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या कोरोनाच्या महामारीत अनेक दिग्गज लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. पंडित राजन मिश्रा यांच्या मृत्यूने कला व संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय गीतकार पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांच्या मृत्यूवर लता मंगेशकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी ट्विटर व फेसबुक पोस्टद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.