नात्याला काळीमा! जन्मदात्या आईची मुलीनेच केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणामधील फरीदाबाद या ठिकाणी आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये मुलीनेच आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. क्राईम ब्रांचने या खुनाचा उलगडा केला आहे. प्रेमप्रकरणामुळे मुलीने आपल्या एका मित्राच्या मदतीने जन्मदात्या आईची हत्या केली आहे. अल्पवयीन मुलीला आपल्या मित्रासोबत राहायचं होतं. तिला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. मात्र आई यामुळे खूश नव्हती. तिचा या प्रेमप्रकरणाला विरोध होता. यामुळे मुलीने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला.

या आरोपी अल्पवयीन मुलीने रात्री आईला लिंबू सरबत दिलं. त्यामध्ये तिने झोपेच्या काही गोळ्या टाकल्या. त्यानंतर तिने आपल्या मित्राला व्हिडीओ कॉल केला. तेव्हा मित्राने हत्या कशी करायची हे सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी मुलीसह दोन आरोपींना अटक केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याचे आणि अल्पवयीने मुलीचे प्रेमसंबंध होते. मात्र मुलीच्या आईचा या नात्याला विरोध होता. यामुळेच या दोघांनी तिला मारण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपी झोपेच्या गोळ्या घेऊन आला आणि मुलीने त्या सरबतमध्ये टाकून आपल्या आईला दिल्या अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

आरोपीने रात्री व्हिडीओ कॉल करून मुलीला उशीने तिच्या आईचं तोंड दाबायला सांगितलं. तसेच ओढणीच्या मदतीने गळा आवळण्याचाही सल्ला दिला. मुलीने प्रियकराच्या सांगण्यावरून आपल्या आईची हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.