धुळे : हॅलो महाराष्ट्र – जून महिन्यात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेत असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला आणि राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले. यानंतर शिंदे गट आणि भाजपने मिळून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. यानंतर राज्यातील जनतेमध्ये समिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे समर्थन केले जात आहे. तर काही ठिकाणी शिंदे गटाला विरोध करण्यात येत आहे.
धुळे दौऱ्यात दादा भुसेंचा 'पन्नास खोके मंत्री OK' घोषणा देत शेतकऱ्यांकडून जाहीर निषेध pic.twitter.com/weQn045iQR
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) September 3, 2022
दादा भुसेंना दाखवले काळे झेंडे
शिंदे (Eknath Shinde) गटातील सदस्य आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे आज धुळे जिल्ह्याचा दौऱ्यावर असताना त्यांना एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. दादा भुसे हे धुळे दौऱ्यावर असताना त्यांच्या दौर्यादरम्यान शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या दौऱ्यादरम्यान साक्री तालुक्यातील कासारे गावात उद्घाटन करत असताना शेतकर्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. इतकेच नव्हे तर पन्नास खोके मंत्री ok अशा जोरजोरात घोषणा देत यावेळी शेतकर्यांनी दादा भुसे यांचा निषेध केला.
यानंतर मंत्री भुसे यांनी काळे झेंडे दाखवणार्या शेतकर्यांना समजूत घालण्यासाठी जवळ बोलावले. मात्र, या शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही. जून महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्याने दादाजी भुसे हे शिंदे गटात सामील झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दादा भुसे यांची मागच्या 20 वर्षांपासून मैत्री असल्याने ते त्यांच्यासोबत गेले आहेत.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?