शेतकरी आंदोलनावर केंद्राचा शेवटचा घाव! दिल्ली हिंसाचारप्रकरणी शेतकरी नेत्यांवर विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेले ६२ दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मोदी सरकाराच्या कृषी कायद्याविरुद्ध शांतीपूर्ण आंदोलन करत आहेत. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (26 जानेवारी) आयोजित ट्रॅक्टर रॅलीदरम्यान काही शेतकरी गट आणि पोलीस यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, झालेल्या हिंसाचाराबद्दल आता दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर आणि सतनामसिंग पन्नू आणि योगेंद्र यादव यांची नावं दाखल केली आहेत. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखबीरसिंग उर्फ ​​लखा सिधाना हे देखील दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 22 जणांना विरोधात विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी आतापर्यंत 93 जणांना अटक केल्याचं बोललं जात आहे. तर 200 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला जात आहे की पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी जारी केलेल्या एनओसीचे पालन केले गेले नाही. कालच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, दिल्ली पोलिसांच्या पत्रकार परिषदेत काल झालेल्या हिंसाचाराबद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास आम्ही कधीच नाही म्हटलेलं नाही, असंही ते म्हणाले.

कट रचल्याचा संयुक्त किसान मोर्चाचा आरोप
संयुक्त किसान मोर्चाने किसान मजदूर संघर्ष समितीवर कट रचल्याचा आरोप केला आहे. संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं की, दीप सिद्धू आणि किसान मजदूर संघर्ष समिती या असामाजिक घटकांनी षडयंत्रांतर्गत शेतकरी आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’