चचेगाव येथे शेतकरी विकास पॅनेलचा 13- 0 ने विजय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

चचेगाव (ता. कराड) येथील चचेगाव विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने 13-0 असा विजय मिळवला. चचेगाव विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ॲड. उदयसिंह पाटील, कराड दक्षिणचे विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने चुरशीच्या झालेल्या लढतीत १३-० जागा जिंकून विजय प्राप्त केला आहे.

शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे जगन्नाथ गोविंद पवार, पोपट उर्फ सुहासभाऊ बाळकृष्ण पवार, लालासो यशवंत पवार, विलास भिमराव पवार, शिवाजी शंकर पवार, सुहास जगन्नाथ पवार, माधवराव दत्ताजीराव पवार, सर्जेराव हिंदुराव पाटील, शारदा सोपान पवार, शांताबाई विश्वनाथ पवार, आत्माराम चिंगाप्पा काळुके, अनिल रामदास बारटक्के, बबन ज्ञानू बोडरे हे उमेदवार निवडून आले आहेत. सर्व विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

स्थानिक नेते व कार्यकर्ते यांचे निवडणुक काळातील परिश्रम व सभासदांनी दाखविलेला विश्वास यामुळे शेतकरी विकास पॅनेलला घवघवीत यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवारांनी यावेळी दिली. निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्याच्यांत उत्साह संचारला होता. कार्यकर्त्यानी फटाके फोडून गुलालाची उधळण केली. सर्व विजयी उमेदवारांचे ॲड.उदयसिंह पाटील, आ.पृथ्वीराज चव्हाण, अविनाश मोहिते यांनी अभिनंदन केले.