आता FASTag ची अंतिम मुदत वाढणार नाही, टोल प्लाझावर कधीपासून अनिवार्य होईल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य होणार आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हे स्पष्ट केले आहे की, सरकार आता फास्टटॅगची मुदत वाढवणार नाही. अशा परिस्थितीत, ज्यांनी अद्याप आपली वाहनांना फास्टॅग लावलेले नाहीत, त्यांनी लवकरात लवकरलावावेत, अन्यथा येत्या काळात त्यांच्या समस्या वाढतील.

या तारखेपासून फास्टॅग अनिवार्य असेल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार टोल प्लाझावर अद्याप फास्टॅग बंधनकारक नाही. मात्र 15 फेब्रुवारीपासून फास्टॅग सर्व टोल प्लाझावर बंधनकारक असेल. अशा परिस्थितीत काही लोकं जर असा विचार करत असतील की सरकार पुन्हा एकदा फास्टॅगची अंतिम तारीख वाढवतील तर मग लक्षात घ्या की सरकार यापुढे फास्टॅगची अंतिम मुदत वाढवणार नाही.

फास्टॅगद्वारे मिळाले इतके उत्पन्न
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या फास्टॅगद्वारे दरमहा 2,088.26 कोटी रुपये उत्पन्न मिळते. त्याचबरोबर टोल प्लाझावरील व्यवहाराचे स्पष्टीकरण देण्यासाठी सरकार 15 फेब्रुवारीपासून संपूर्ण देशात फास्टॅग अनिवार्य करणार आहे. याआधी फास्टॅगची अंतिम मुदत पूर्वी 1 जानेवारी 2021 होती. जी सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली होती. पण आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की,”यापुढे फास्टॅगची मुदत वाढविण्यात येणार नाही.”

फास्टॅग कसे काम करते
टोल प्लाझावर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFIDO) च्या मदतीने फास्टॅग स्कॅन केले जाते. जे आपल्या बँक खात्याशी कनेक्ट होईल. अशा परिस्थितीत, आपल्या बँक खात्यातून टोलची रक्कम आपोआप कट केली जाईल आणि टोल प्लाझाचा गेट आपोआप उघडला जाईल.

फास्टॅग नसेल तर येईल ‘ही’ समस्या होईल
जर आपले वाहनाला फास्टॅग लावलेले नसेल तर 15 फेब्रुवारी नंतर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल. याद्वारे सरकार कॅश व्यवहारही पूर्णपणे थांबवू शकते. ज्यामुळे आपल्याला टोल प्लाझावर आपल्याला अधिक त्रास होऊ शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

 

You might also like