समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच; भरधाव कारची करंटेनरला धडक; एकजण जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) भीषण अपघाताचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे. कारण आज पुन्हा एकदा याच महामार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी आहे. हा अपघात आज वाशिम येथील मालेगाव-वनोजा दरम्यान लोकेशन चॅनल क्रमांक 234 कॉरिडॉर येथे घडला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील लोकेशन चॅनल क्रमांक 234 कॉरिडॉर येथे पुण्यावरून अमरावतीला जाणाऱ्या एका कारने कंटेनरला मागून जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरात बसली की कार पूर्णपणे चक्काचूर झाली. तसेच, शकील पठाण या 27 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. त्याचबरोबर, चंदू जाधव 28 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळतात तरुणांना वाजवण्यासाठी परिसरातील स्थानिक गोळा झाले होते. तसेच, पोलिसांना देखील घटनास्थळी बोलावून घेण्यात आले होते. मात्र तोपर्यंत शकील पठाण या तरुणाचा मृत्यू झाला होता. सांगितले जात आहे की, एम एच 12 एस वाय 9488 ही कार रात्री 11 च्या सुमारास पुण्यावरून अमरावतीकडे निघाली होती. मात्र रात्रीच्या अंधारात कंटेनर न दिसल्यामुळे कारची कंटेनरला जोरात धडक बसली आणि हा अपघात झाला.

दरम्यान, समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून हा मार्ग मृत्यूचे दार बनला आहे. कारण दर दोन दिवसानंतर या महामार्गावरून अपघाताच्या घटना समोर येत आहेत. सहसा पहाटेच्या सुमारास किंवा रात्रीच्या वेळेस हे अपघात घडत आहेत. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये 368 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे.