सातारा | कौटुंबीक कारणांवरुन पित्याने स्वताः च्या ८ वर्षीय मुलास विषारी औषध पाजुन त्यांचा खून केला होता. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याचे सुनावणी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधिश आर.डी.सावंत सातारा यांचे कोर्टात होवुन आरोपी पित्यास जन्मठेप व रु २००० / – दंड दंड न दिलेस २ महीने साधी कैद, १ वर्ष सक्त मजुरी व रु .१०० / – दंड दंड न दिलेस २ महीने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, संतोष लक्ष्मण भिंगारे (वय- ३५, रा. पाचवड, ता. वाई) हा पत्नी वैशाली व दोन मुले कुमारी राजश्री (वय १० वर्ष) व मुलगा शिवराज (वय ८ वर्ष) यांचेसह उदरनिर्वाहासाठी पाचवड येथून सासरवाडीत शिवनी (ता.कडेगाव जि.सांगली) येथे एक वर्षापासून एकत्रित राहुन मोलमजुरी करत होते. तेथेच आपले दान्ही मुलांना शाळेत घातलेले होते. पती-पत्नीमध्ये घरगुती व कौटुबीक कारणावरुन किरकोळ भांडणे होत होती. आरोपी संतोष भिंगारे याचे वडील मयत झाल्याने तो शिवनी येथून गावी पाचवड येथे एकटाच आलेला होता. दि.०३ / ३ / २०१७ आरोपी संतोष भिंगारे हा पाचवड येथुन शिवनी (ता.कडेगाव) येथे आपले पत्नीकडे न जाता मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत परस्पर शाळेत जावून मुलगा शिवराज यास शाळेतुन जबरदस्तीने घरी घेवुन जावु लागला. त्यावेळी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांना न जुमानता मुलगा शिवराज यास पाचवड, ता.वाई येथे आला.
दरम्यान घडलेला प्रकार शिक्षकांनी मुलाचे आईस कळविला. मुलाची आई वैशाली चिंचणी वांगी (ता.कडेगाव) येथील पोलीस ठाणेस खबर देणेस गेल्या. तेथे मुलगा शिवराज यास माझ्या पतीने जबरदस्तीने शाळेतुन घेवुन गेले आहेत. याबाबत पोलीस ठाणेत तक्रार त्या नोंदवत असतानाच मुलगा शिवराज याचा फिर्यादी वैशाली हीचे फोनवर फोन आला व मुलगा शिवराज याने सांगितले की वडीलांनी मला विष पाजले आहे. तसेच त्यांनी स्वतः ही विष प्राशन केलेले आहे. त्याच वेळी वैशाली यांनी पोलीस ठाणेत सदर खबर लिहुन घेणारे पो.ना.साठे यांचेकडे फोन दिला असता, शिवराज याने पोलीसांनादेखील तिच हकीकत सांगितली. त्यावेळी तुम्ही कोठे आहात असे विचारले असता त्याने आम्ही वाई येथे कृष्णा नदीचे पुलाजवळ आहोत, असे सागितले. आरोपी संतोष भिंगारे व त्यांचा मुलगा शिवराज यांना दि .०४ / ०३ / २०१७ रोजी सिव्हील हॉस्पीटल सातारा येथे उपचारास दाखल केले. त्यावेळी शिवराज याची प्रकृती बिघडल्याने सातारा हॉस्पीटल रीसर्च सेंटर सातारा येथे उपचार घेत असताना १०/०३/२०१७ रोजी त्याचा मृत्यु झाला. सदर घटनेबाबत मुलाची आई वैशाली संतोष भिंगारे यांनी दिले खबरी वरुन फिर्याद दाखल केली होती.
या गुन्हयाचा तपास करुन आरोपीचे विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सदर गुन्हयाचा तपास पो.उप.निरीक्षक गणेश कदम व पो.उप निरीक्षक साळी यांनी तत्कालीन भुईंज पोलीस स्टेशन यांनी करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावे तसेच शास्त्रोक्त पुरावा प्राप्त करुन मुदतीत मा.न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर केले होते. नमुद खटल्याची सुनावणी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश आर.डी.सावंत यांचे न्यायालयामध्ये झाली. याप्रकरणी न्या. सावंत यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
नमुद खटल्याची सुनावणीमध्ये सरकारी वकील नितिन दिनकरराव मुके यांनी काम पाहीले. पो.कॉ.रोहीत यादव, पोलीस उप – निरीक्षक राजेंद्र यादव,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे, पोलीस अंमलदार स.पो.उप. नि. श्रीमती घारगे, पो.हवालदार शेख, श्री. बेंद्रे ,श्री. शिंदे,श्री. शेख, श्री. कुंभार, श्री. घोरपडे, श्री. भरते यांनी केस मध्ये सरकारी वकील यांना योग्य ते सहकार्य केले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba