अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत ; राणेंची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अतिशय तापलं अजून भाजप कडून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले जात आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याकरिता कधी पवार साहेबांचे अदृश्य हात जाणवले नाहीत पण मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही याकरिता अनेक वेळा त्यांची भूमिका जाणवली. ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे सगळ्या बाजूने तीन तेरा वाजवले. अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत. असे ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

न्यायालयात नक्की काय घडलं

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं. 50% ची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण अवैध असल्याचं कोर्टाने सांगितलं.

You might also like