मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटून घरी परतणाऱ्या वडिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील बार्शी-सोलापूर रोडवर काळेगाव पाटीजवळ एक विचित्र अपघात घडला. या अपघातात दोन दुचाकीमध्ये जोरदार धडक होऊन दोन्ही दुचाकी जागीच पेटल्या. या आगीच्या भडक्यामध्ये एक जण जागीच मृत झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने बार्शीला हलवण्यात आले आहे.

या अपघातात मोहोळ तालुक्यातील वाळूजचे सुरतिशेन मोटे व रामचंद्र मोटे हे दोघे भाऊ दुचाकीवरून बार्शीकडे निघाले होते. रामचंद्र मोटे यांच्या मुलीच्या विवाह ९ फेब्रूवारी रोजी असल्याने पाहुण्यांना लग्नाची पत्रिका देण्यासाठी बार्शीला येत होते. दुपारच्या पावणेतीन वाजता बार्शीकडे जात असताना ही दुर्देवी घटना घडली. दोन्ही दुचाकी पेट घेतल्याने जळून खाक झाल्या असून जखमींमध्ये वाळूजचे मोटे व उस्मानाबाद येथील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याचसोबत मुलीच्या लग्नावेळी जन्मदात्या पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मोटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.